पुणे जिल्ह्यात महालोकअदालतमध्ये  ३७ हजार ३१२ दावे निकाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

महालोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यात ७९ हजार ३१२ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३७ हजार ७२१ दावे निकाली काढण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राज्यातील ३४ जिल्ह्यांत महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राज्यात एकूण ७ लाख ७९ हजार ५८३ खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी १ लाख ३८ हजार ६४ दावे निकाली काढण्यात आले.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ba36a92b-b4b3-11e8-9dda-4ba8ea0d971f’]

या लोकअदालतमध्ये सर्वाधिक दावे निकाली काढत पुणे जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकाविला आहे. मागील काही कालावधीमध्ये दाखलपूर्व दावे निकाली काढण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात १ लाख १६ हजार ९२३ दाखलपूर्व दावे निकाली काढण्यात आले. उर्वरित २१ हजार १४१ दावे प्रलंबित स्वरूपाचे आहेत. पुणे जिल्ह्यात महालोकअदालतमध्ये दाखलपूर्व आणि प्रलंबित स्वरूपाचे दिवाणी, फौजदारी दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यात राज्यात सर्वाधिक दावे निकाली काढण्यात यश आले आहे. निकाली काढण्यात आलेल्या दाव्यातील तब्बल ३५ हजार ४४७ दावे दाखलपूर्व आहेत. तर २ हजार २७४ दावे प्रलंबित स्वरूपाचे आहेत. यात ३९ कोटी ४० लाख ९३ हजार २५८ रुपयांची नुकसानभरपाई वसूल करण्यात आली असल्याचे माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांनी दिली. तर सातारा जिल्हाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तेथे १ लाख १७ हजार ७२१ पैकी ३२ हजार ६१५ दावे निकाली निघाले. त्यापैकी ३१ हजार ८९७ दावे दाखलपूर्व आहेत. तर उर्वरित ७१८ प्रलंबित स्वरूपाचे आहेत. त्यानंतर तिसरा क्रमांक रायगड जिल्ह्याचा आहे.

भारत बंदला पुण्यात हिंसक वळण

रायगडमध्ये ५९ हजार ९२७ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी १४ हजार ११४ दावे निकाली काढण्यात आले. त्यापैकी १३ हजार ७६६ खटले दाखलपूर्व आहेत. तर उर्वरित ३९८ दावे प्रलंबित स्वरूपाचे आहेत. यापूर्वी १४ जुलै रोजी झालेल्या लोकअदालतीमध्ये पुणे जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला होता. त्यावेळी पुण्यात ६५ हजार १४७ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २५ हजार ७६५ दावे निकाली काढून, २० कोटी ३५ लाख ८३ हजार ६८३ रुपयांची नुकसानभरपाई वसूल केली होती.