३७ वर्षीय चुलतीचा १८ वर्षीय पुतण्यावर जडला जीव, केला प्रेमविवाह

हिंगोली : वृत्तसंस्था – प्रेमाला वय नसतं असे म्हटले जाते. कधी आणि कोणत्या वयात एखाद्यावर प्रेम जडेल याचा काही नेम नाही. असाच प्रकार हिंगोली जिल्ह्यात घडला आहे. ३७ वर्षीय चुलतीचा आपल्याच १८ वर्षाच्या पुतण्यावर जीव जडला. या दोघांनी देवळात जाऊन लग्न देखील केले. या आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात सुरू आहे. तर या लग्नामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील नहाद गावात राहणारी ३७ वर्षीय चुलतेचे तिच्या १८ वर्षीय पुतण्याबरोबर प्रेमसंबंध जुळले. या नात्याला तडा जाऊ देत दोघांनी शनिवारी (दि.११) हट्टा येथील मंदिरात जाऊन एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न केले. चुलतीचे आणि पुतण्याचे प्रेमप्रकरण काही दिवसांपासून सुरु होते. तसेच लग्न करणाऱ्या या महिलेला दोन आपत्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेचे नाव मालती (नाव बदलले आहे) तर पुतण्याचे नाव सोनु बोरगड आहे.

दरम्यान, या विवाहित महिलेने चक्क पुतण्यासोबतच प्रेम विवाह करून खळबळ उडवून दिली आहे. या चुलती व पुतण्याने आणाभाका ऐकमेकांना देत ‘जान जाये लेकिन वचन न जाये’ या ओळीचा प्रत्यय प्रेमसंबंधात उतरविला आहे. चुलती व पुतण्याच्या या प्रेमविवाहाची चर्चा जिल्हाभरात पसरली आहे.

Loading...
You might also like