Coronavirus : दौंडमध्ये 3724 जण ‘होम क्वारंटाइन’

पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण जगाची डोकेदुखी बनलेल्या कोरोना व्हायरसमुळे आता बाहेर देशातून तसेच पुणे, मुंबई, व अन्य शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दौंड तालुक्यामध्येही अश्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आता तालुक्यामध्ये ३७२४ नागरिकांची तपासणी स्क्रिनिंग करून त्यांना ‘होम क्वारंटाइन’ घरात राहून विलगीकरण करण्यात आले आहे अशी माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी बोलताना दिली आहे. या लोकांच्या हातांवर तसे शिक्के मारण्यात आले असून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

You might also like