home page top 1

दौंड तालुक्यातील १० रस्त्यांसाठी ३८ कोटी ३३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख ) – राज्याचा सन २०१९ – २० चा पुरवणी अर्थसंकल्प विधीमंडळात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच सदर केला, यावेळी दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची व नागरिकांची दळणवळणाची सोय लक्षात घेता आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांनी विविध रस्त्याच्या कामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचेकडे पाठपुरावा करत दौंड तालुक्यातील १० रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ३८ कोटी ३३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या रस्त्याच्या मंजूरीमुळे गोपाळवाडी ,गिरीम , नानविज, गार, बेटवाडी, सोनवडी, कानगाव या गावांना थेट कुरकुंभ व पुणे सोलापूर रोड ला जाण्यासाठी शॉर्टकट मार्ग मिळणार असून गोपाळवाडी व गिरिम मधील वाड्या वस्त्या यामुळे जोडणार आहेत तर दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वे स्टेशन ते गलांडवाडी फाटा या ६ किलोमीटर रस्त्याची सुधारणा करण्यासाठी सुमारे ९० लाख रुपयांचा निधी राज्याच्या सन २०१९-२० च्या पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे. दौंड तालुक्यातील नानविज, वायरलेस फाटा गिरिम रस्ता (गावडेवस्ती ते गोळीबार मैदान साडेचार किमी रस्ता) करण्यासाठी राज्याच्या सन २०१९ -२० च्या पुरवणी अर्थसंकल्पात सुमारे २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

नानविज व गिरिम परिसराला यापूर्वी आमदार कुल यांच्या माध्यमातून निधी मिळाला असून महत्त्वाचा असणारा अष्टविनायक मार्ग देखील याच परिसरातून जात असल्यामुळे शेजारील गावांचे दळणवळण अधिक सोयीस्कर होणार आहे. यामध्ये नानविज परिसरातील पोलीस प्रशिक्षण केंद्राला देखील निधी देण्यात आला आहे.

अर्थसंकल्पीय निधी मिळवण्यात दौंड तालुका हा पुणे जिल्ह्यात अग्रेसर राहिला असून दौंड तालुक्याला सुमारे ३८ कोटी ३३ लक्ष रुपयांचा निधी या पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर झाला आहे. या कामांमुळे पुढील काळात विकासकांमाना अधिक गती मिळणार असून रस्ते हायटेक व अधिक मजबूत व्हायला मदत होणार आहे. येत्या काही दिवसात या कामाची निविदा प्रकिया पूर्ण होऊन लवकरच या कामाला प्रत्यक्ष सुरवात होईल अशी माहिती आमदार अ‍ॅड. कुल यांनी दिली.

आरोग्य विषयक वृत्त

‘केस’ धुताना घ्या ही काळजी

‘या’ गोष्टी फॉलो करा आणि निकालाचे नैराश्य घालवा

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म

या मेकअप टिप्समुळे तुम्ही सावळे असाल तरीही दिसाल सुंदर

Loading...
You might also like