३८ लाखाच्या परकीय चलनाची तस्करी करणारा सिमा शुल्क विभागाच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर परकीय चलनाची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीस सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्याकडून ३८ लाख ४१ हजार रुपयांचे परकिय चलन जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी सांयंकाळी करण्यात आली. विशाल गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल गायकवाड हा ३८ लाख ४१ हजार रुपये किंमतीचे परकीय चलन घेऊन परदेशात जात होता. त्यावळी सीमा शुल्क अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आल्याने त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. बॅगेमध्ये कुवेत, बहीरन, दुबई आणि ओमान देशातील चल आढळून आले. गायकवाड हा पुणे आंतरराष्ट्रीय विमानताळावरून एअर इंडीयाच्या विमानाने तो परदेशात जात असताना सीमा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

ही कारवाई उपायुक्त भारत नवले, अधीक्षक विनीता पुसदकर, माधव पाळनीतकर, सुधा अय्यर, निरीक्षक राजेंद्रप्रसाद मीना, अश्विनीकुमार देशमुख, अमजद शेख, देशराज मीना, सुषमा जाधव, हवालदार डी.व्ही. बगडे, ए.एन भट्ट यांच्या पथकाने केली.