#MadrasDay ट्रेंडिंगमध्ये ? ‘हा’ आहे या ‘हॅशटॅग’चा इतिहास

Advt.

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आज मद्रास डे साजरा करण्यात येत आहे. मद्रास डे हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर चांगलाच ट्रेडिंगमध्ये आहे. तमिळनाडूची राजधानी असलेले मद्रास अर्थात चेन्नईचा आज वाढदिवस चेन्नईवासियांकडून साजरा करण्यात येतो. चेन्नई म्हणजेच पूर्वीच्या मद्रास शहराला आज 380 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त आज मद्रास दिवस साजरा करण्यात येत आहे. याच कारणाने आज तुम्हाला ट्विटरवर #MadrasDay ट्रेंडिगमध्ये दिसेल.

या शहरातचे नाव पूर्वी चेन्नापट्टम आणि मद्रासपट्टम होते. नंतर या शहराला मद्रास अशी ओळख मिळाली, आता या शहराला चेन्नई म्हणून ओळखले जाते.

https://twitter.com/natty_nandhu/status/1164316230418718720

या शहराची २२ ऑगस्ट १६३९ साली स्थापना करण्यात आली, यानंतर २००४ सालापासून चेन्नई हेरिटेज फाऊंडेशनकडून चेन्नई दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. यानिमित्त चेन्नई शहरात आज विविध संस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येतात. चेन्नई आता आयटी हब म्हणून ओळखले जाते, या चेन्नईतून अनेक प्रसिद्ध, तज्ज्ञ आणि दिग्गज लोक भारताला लाभले.

आता सोशल मिडियावर चेन्नई दिवस चांगलाच टेंड्रिंगमध्ये आहे. नेटकरी आज या संबंधित अनेक पोस्ट शेअर करत आहेत. यातून ते चेन्नईबद्दल असलेले आपले प्रेम व्यक्त करत आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त –