मित्र माहेश्वरी सेवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित १६ व्या भव्य रक्तदानं शिबिरा मध्ये ३९७ रक्तदात्यानी केले रक्तदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मित्र माहेश्वरी सेवा प्रतिष्ठान, सिंहगड रोड, पुणे तर्फे स्व:नीलेश बद्रीनारायणजी डागा यांच्या स्मृति प्रीत्यर्थ आयोजित १६ वे भव्य रक्तदानं शिबिर नुकतेच रविवार, दिनांक ३ मार्च २०१९ रोजी भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर, माणिकबाग, सिंहगड रोड येथे पार पडले. या रक्तदान शिबिरात एकूण ३९७ बैग रक्त संकलन करण्यात आले. सौ.आनंदीबाई हीराचंद शाह ट्रस्ट; जैन जागृति महिला मंच, माणिक बाग; लायंस क्लब पुणे – सिंहगड रोड; माहेश्वरी नारायणपुर ग्रुप – पुणे; रक्ताचे नाते चैरिटेबल ट्रस्ट हे या शिबिराचे सहआयोजक होते. महेश सहकारी बैंक लिमिटेड, पुणे तर्फे आयोजित रक्तदान शिबिरास विशेष योगदान व सहकार्य लाभले.

राष्ट्रवादी कांग्रेसचे बारामती मतदार संघाचे लोकप्रिय खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या कार्यकर्तांसोबत या शिबिरास सदिच्छा भेट दिली. सोबतच या रक्तदान शिबिरास सिंहगडरोड च्या विविध प्रभागातील आजी माजी नगरसेवकांनी, आमदारांनी, शहरातील विविधि नामांकित संस्थान च्या पदाधिकार्यांनी , पुण्यातील अनेक नामवंत उद्योजकांनी, समाजसेवकांनी आपली उपस्थिति लावली व मंडळाला आपल्या शुभेच्छा दिल्या. या आयोजनासाठी सांगवी परिसर महेश मंडळ चे अध्यक्ष श्री.सतीश जी लोहिया, सामाजिक कार्यकर्ता आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉ. श्री.शालीग्राम जी भंडारी, महेश बैंक चे माजी चेयरमैन व डायरेक्टर श्री.जुगलकिशोर जी मालू, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगति मंडळ चे अध्यक्ष श्री.नरेंद्र जी चांडक, 3S सर्विस स्टेशन (इंडियन ऑइल पेट्रोल पंप, माणिकबाग) च्या सर्वोसर्वा श्रीमती.सुजाता जी शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मित्र माहेश्वरी सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री.गोपाल जी राठी, मित्र माहेश्वरी सेवा प्रतिष्ठान महिला समितिच्या अध्यक्षा सौ. सीमा जी राठी यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत सत्कार केले. आयोजनाचे सूत्र संचलन सौ.सुजाता जी बियाणी, श्री.मयूर जी मूंदड़ा, श्री.मधुर जी डागा यांनी केले. या आयोजनाला भव्य दिव्य आणि यशश्वी बनवण्यासाठी मित्र माहेश्वरी सेवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्तांनी त्यांस दिलेली जबाबदारी व कार्य पूर्ण निष्ठा आणि चिकाटी ने पूर्ण करत आपला अमूल्य असा योगदान दिला त्यामुळे आयोजना दरम्यान येणाऱ्या सर्व मान्यवरांना, रक्तदात्यांना मंडळा कडून उत्कृष्ट नियोजन,सुयोग्य व्यस्थापन, निस्वार्थ समाज सेवा आणि उत्तम समन्वयाचा अनुभव आला.

मित्र माहेश्वरी सेवा प्रतिष्ठान, सिंहगड रोड, पुणे तर्फे दर वर्षी मंडळा कडून आपल्या सामाजिक, राष्ट्रिय आणि देशाप्रति असणाऱ्या उत्तरदायित्वला पूर्णकरण्या साठी वर्षभर अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. रक्तदान शिबिर हे मंडळाचे प्रमुख वार्षिक आयोजना पैकी एक आहे. रक्त दान शिबिरात रक्त संकलना साठी आलेल्या रक्तपेढ़ी कडून प्राप्त होणाऱ्या फ्री ब्लड बैग कूपन्स द्वारे संस्था स्वतः व रक्ताचे नाते चैरिटेबल ट्रस्ट मार्फ़त गौर गरीब व गरजू रूग्णांना मोफत ब्लड बैग उपलब्ध करुन देते. मंडळा कडून आयोजित या रक्तदानं शिबिराच समाजातील सर्वच थरातून कौतुक आणि केलेल्या उत्कृष्ट नियोजना बद्दल अभिनन्दन केल जात आहे.