3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | तिसरी ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; कल्याण इलेव्हन, टायटन बुल्स् संघांची विजयी कामगिरी!!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – 3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament | स्पार्टन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित तिसर्‍या ‘स्पार्टन मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत कल्याण इलेव्हन संघाने सलग पाचवा तर, टायटन बुल्स् संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून चौथ्या विजयासह आगेकूच केली. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ऋत्विक महाजन याच्या ७३ धावांच्या खेळीमुळे कल्याण इलेव्हन संघाने युनायटेड थंडरझ्चा ५५ धावांनी पराभव करत सलग पाचवा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कल्याण इलेव्हनने २१९ धावांचा डोंगर उभा केला. ऋत्विक महाजन याने ७३ धावांची खेळी केली. आकाश शहा (३८ धावा), जितेंद्र राऊत (३१ धावा) आणि कुणाल शहा (२५ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना युनायटेड थंडरझ् संघाचा डाव १६४ धावांवर मर्यादित राहीला.

संतोषकुमार सांगळे याच्या फलंदाजीच्या जोरावर टायटन बुल्स् संघाने लिजंड्स स्पोर्ट्स क्लबचा २ गडी राखून पराभव करत चौथा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लिजंड्स स्पोर्ट्स क्लबने २२५ धावांचे आव्हान उभे केले. अभिषेक बोधे याने ७० धावांची खेळी केली. यासह गणेश जोशी याने ६३ धावांचे योगदान दिले. टायटन बुल्स् संघाने १८.३ षटकात हे आव्हान गाठले. संतोषकुमार सांगळे याने ३८ चेंडूत १३ चौकारांसह ६८ धावा फटकावल्या. सुनिल यादव (नाबाद ४५ धावा) आणि गिगी खोखर (३७ धावा) यांनी योग्य साथ देत संघाचा विजय सोपा केला. (3rd Spartans Monsoon League T-20 Cricket Tournament)

शराफत अली शहा याच्या तुफानी खेळीमुळे युनायटेड थंडरझ् संघाने सेकंड इनिंग क्लबचा ४ गडी राखून पराभव करत
दुसरा विजय नोंदविला. सेकंड इनिंग क्लबने प्रथम फलंदाजी करताना २०३ धावांचे आव्हान उभे केले.
मंदार सुर्वे याने ५८ धावांची खेळी केली. युनायटेड थंडरझ्ने हे आव्हान १६.५ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले.
शराफत अली शहा याने फक्त १९ चेंडूत ४ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने नाबाद ७३ धावा चोपून काढल्या.
सिद्धार्थ रोमन याने सुद्धा ६४ धावांची खेळी करून योग्य साथ देत संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
सेकंड इनिंग क्लबः २० षटकात ५ गडी बाद २०३ धावा (मंदार सुर्वे ५८ (२९, ८ चौकार, ३ षटकार), कुणाल फणसे ३६,
अमोल ठोंबरे २५, आदित्य कर्जतकर २-२९) पराभूत वि. युनायटेड थंडरझ्ः १६.५ षटकात ६ गडी बाद २०४ धावा
(शराफत अली शहा नाबाद ७३ (१९, ४ चौकार, ९ षटकार), सिद्धार्थ रोमन ६४ (४४, १० चौकार, १ षटकार), दिनेश नायडू २-२५);
सामनावीरः शराफत अली शहा;

लिजंड्स स्पोर्ट्स क्लबः २० षटकात ६ गडी बाद २२५ धावा (अभिषेक बोधे ७० (३७, ११ चौकार, १ षटकार),
गणेश जोशी ६३ (३५, ३ चौकार, ५ षटकार), विपुल खैरे ३०, अमित भारव्दाज ३-५१) पराभूत वि. टायटन बुल्स्ः १८.३ षटकात
८ गडी बाद २२६ धावा (संतोषकुमार सांगळे ६८ (३८, १३ चौकार), सुनिल यादव नाबाद ४५, गिगी खोखर ३७, विपुल खैरे ३-३५,
सुयश भट २-३९); सामनावीरः संतोषकुमार सांगळे;

कल्याण इलेव्हनः २० षटकात ९ गडी बाद २१९ धावा (ऋत्विक महाजन ७३ (३१, ६ चौकार, ५ षटकार), आकाश शहा ३८,
जितेंद्र राऊत ३१, कुणाल शहा २५, शराफत शहा ३-३५, सिद्धार्थ रोमन ३-३३) वि.वि. युनायटेड थंडरझ्ः २० षटकात ७ गडी
बाद १६४ धावा (सिद्धार्थ रोमन ३८, फैझ शेख ३१, रोहीत गुगळे २-२१, अमत खेडेकर २-३४); सामनावीरः ऋत्विक महाजन.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | गणेश भक्तांसाठी पुणे पोलिसांकडून ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ लाँच (व्हिडीओ)

Supriya Sule | अजित पवारांचा अपमान करण्यासाठी सोबत घेतलं का? पडळकरांच्या विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला थेट सवाल