भुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा झटका

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  शुक्रवारी रात्री दिल्ली, पंजाब आणि हरियाना परिसरात भुकंपाचा हादरा बसला असून त्यामुळे लॉकडाऊनमध्ये घरात असलेले असंख्य लोक घाबरुन रस्त्यावर आले़ रात्री ९ वाजून ८ मिनिटांनी हा भुकंपाचा झटका जाणविला आहे. आजच्या भुकंपाची तीव्रता ४.६ रेक्टर स्केल इतका होता. या भुकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप पुढे आली नाही.

या भुकंपाचा केंद्रबिंदु हरियाणातील रोहतक येथील आहे. या भुकंपाचा झटका गाजियाबाद, गुरुग्राम, नोएडा परिसरातही जाणवला. २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरु आहे. तेव्हापासून राजधानी दिल्ली व परिसरात यापूर्वी ४ वेळा भुकंपाचे झटके जाणवले आहेत.