अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी एका पुरुषासह ३ महिलांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नेवासा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याप्रकरणी नागापूर येथील चौघांना अटक करण्यात आली आहे. सोनई पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

सोनू राजू वाघमारे, सुनीता परशू कांबळे, छाया प्रभाकर पठारे, काजल लखन म्हात्रे (सर्व रा. नागापूर, ता. नगर) ही अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलीच्या अपहरणाबाबत सोनई पोलिस ठाण्यात २६ मे २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानुसार सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास देशमाने यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मदतीने नागापूर येथे शोध घेऊन चौघा आरोपींना अटक करून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली.