पुण्यात ३.५ कोटींच्या हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या ४ जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल साडेतीन कोटी रुपये किंमत असलेले दोन हस्तीदंत दत्तवाडी पोलिसांनी पकडले. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे गार्डनजवळ बुधवारी ही कारवाई करण्यात आली.

आदित्य संदीप खांडगे (वय १९ रा. देहूफाटा), ऋषिकेश हरिश्चंद्र गायकवाड (वय २८, रा. विवेकानंद नगर,वाकड), अनिकेत चंद्रकांत अष्टेकर (वय २६, रा. नगर कल्याण रोड, अहमदनगर), अमित अशोक पिस्का (वय २८, रा. सामलवाडा, अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे गार्डनजवळ बस स्टॉपवर हस्तीदंत विक्रीसाठी चौघे जण येणार असल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, हवालदार फुलपगारे, घोटकुले, यादव, गाढवे, सुतकर, राऊत, वाबळे, लोहार यांना कारवाई करण्याची सूचना दिली.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पोलीस तेथे गेले. त्यावेळी बसस्टॉपजवळ चौघे जण उभे होते. खबर देणाऱ्याने त्यांच्याकडे इशारा केला. त्यांच्यातील एकाकडे सॅक होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता सॅक मध्ये दोन हस्तीदंत मिळाले. त्यातील एकाचे वजन ८८६ ग्रॅम असून लांबी ३३ सेंटीमीटर आहे तर, दुसरे ९९८ ग्रॅम असून लांबी ३५ ग्रॅम आहे.

चौघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांनी हे हस्तीदंत कोठून आणले होते आणि कोणाला विकणार होते, याचा तपास करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

चमकणाऱ्या ‘विजांपासून’ असा करा स्वतःचा बचाव 

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे 

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय 

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक