४ सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील ४ सहायक पोलीस आयुक्तांच्या पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या सहायक पोलीस आयुक्ताचे नाव आणि कंसात कोठून कोठे बदली झाली ते पुढील प्रमाणे.

श्रीधर पांडुरंग जाधव (सहायक पोलीस आयुक्त वाकड ते सहायक पोलीस आयुक्त प्रशासन), अश्विनी राख (सहायक पोलीस आयुक्त प्रशासन ते सहायक पोलीस आयुक्त वाकड), गणपतराव सदाशिव माडगुळकर (सहायक पोलीस आयुक्त देहुरोड ते सहायक पोलीस आयुक्त विशेष शाखा व नियंत्रण कक्ष), श्रीकांत मोहिते (सहायक पोलीस आयुक्त विशेष शाखा व नियंत्रण कक्ष ते सहायक पोलीस आयुक्त देहुरोड)