Beed : सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 नराधमांना मरेपर्यंत जन्मठेप, बीड न्यायालयाचा निर्णय

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – एकट्या महिलेवर सामूहिक बलात्कार (gang rape) करणाऱ्या चार जणांच्या टोळीला बीड जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची (life imprisonment) शिक्षा सुनावली आहे. बीड जिल्हा न्यायालयाच्या (beed court) या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे 2015 मध्ये ही घटना घडली होती.

पाचेगाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आज बीड जिल्हा सत्र मुख्य न्यायालयाने सुनावली आहे. तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यात जिजा लालसिंग राठोड (वय-30), अमोल मदन काष्टे (वय-30), पुंडलिक बन्सी राठोड ( वय-27) आणि नवनाथ बाबुराव जाधव (वय-28) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे.

ही घटना 2015 मध्ये घडली होती. पीडित महिला शेतातून घरी बीडकडे येत होती. त्यावेळी आरोपींनी पीडितेला जीपमध्ये बसवून नेत निर्मनुष्य ठिकाणी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. नंतर मध्यरात्री पीडितेच्या गावाकडील घरी येऊन दरवाजा तोडून घरामध्येही बलात्कार केला होता. या प्रकरणात आज बीड जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत महाजन यांच्या समोर सुनावणी झाली. त्यांनी चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

तसेच दोषींना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणामुळे पिडीतेला न्याय मिळाला असून यात सरकारी वकील म्हणून मिलिंद वाघिरकर यांनी काम पाहिले. सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत शिक्षा दिल्याने गुन्हेगारांमध्ये जरब बसेल असा विश्वास न्यायालयाने व्यक्त केला आहे.

You might also like