रस्तालूट करणारी टोळी तोफखाना पोलिसांनी पकडली

आरोपींना २२ पर्यंत पोलीस कोठडी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बायपास रस्त्यावर वाहन चालकांना लुटणारी टोळी तोफखाना पोलिसांनी आज पकडली आहे. चार जणांना अटक करण्यात आली आहे.

नगर-कल्याण रोडवरील एमआयडीसी बायपास रोडलगत टेम्पोच्या मागून येऊन टेम्पोला दुचाकी आडवी लावून चालकाला मारहाण करून त्याच्याकडील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन, रुपये १२ हजार ५०० रोख तसेच एटीएम कार्ड इतर कागदपत्र लुटून नेल्याची घटना २१ एप्रिल २०१९ रोजी घडली होती. याप्रकरणी किसन महादेव देसाई ( वय ३०ट्रक चालक , सबलखेडा ता – आष्टी ) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती .आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३९२ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .या गुन्ह्यातील आरोपीचा पोलीस शोध घेत असताना माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून टोळीचा म्होरक्या किरण रावसाहेब जरे यांच्यासह आशुतोष भाऊराव शिंदे ,( कोळसगावी ता- पाथर्डी ) व प्रमोद रावसाहेब साठे (१९, गोधेगाव ,ता – नेवासा ) व एक जण असे चार जणांना पकडण्यात आले .आरोपीना न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक २२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली .

तपासात आरोपीकडून नंबर नसलेली हिरो होंडा एमएच १६ सिएम ७११० व काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला .या टोळीकडून या परिसरात घडलेले रास्ता लुटीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . हि कारवाई उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस निरीक्षक मुलाणी,फौजदार मेढे , सोळंके , कर्मचारी दत्तात्रय जपे , सांगळे , मंगेश खरमाळे , अविनाश वाघचौरे , शिरीष तरटे, यांनी केली पुढील तपास पोलीस निरीक्षक मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मेढे करीत आहेत .

Loading...
You might also like