पुणे जि.प. कडून इंदापूर तालुक्यासाठी 4 कोटी 56 लाखाचा निधी : प्रविण माने

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – पुणे जिल्हा परिषद पुणे यांचे माध्यमातून सन २०१९-२० या वर्षासाठी इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ४ कोटी ५६ लाख ६० हजार रूपये निधी मंजूर झाला असुन या निधीतून इंदापूर तालुक्यात ८९ विविध विकास कामे करण्यात येणार असल्याची माहीती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी इंदापूर येथे बोलताना दीली.

यावेळी बोलताना प्रविण माने म्हणाले की, शासन स्तरावरून निधीची कमतरता असताना देखील इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त कामे मंजूर करून आणण्याचा आमचा सदैव प्रयत्न असतो. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीकडून विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत असते. त्या अणूषंगाने जास्तीत जास्त निधी आणण्याचा आमचा प्रयत्न असुन इथुन पुढच्या काळात देखील प्रत्येक ग्रामपंचायतींना आवश्यकते नुसार विकास कामांसाठी निधी ऊपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे माने यांनी सांगीतले.

यामध्ये इंदापूर तालुक्याच्या ग्रामिण भागातील रस्ते दूरूस्ती ६१ लाख, संरक्षक भिंत बांधणे ४० लाख, मंदीर व उद्यान सुशोभिकरण २९ लाख, पेव्हिंग ब्लाॅक बसविणे २७ लाख, कुस्ती आखाडा १० लाख, वाचनालय बांधकाम १७ लाख,व्यायाम शाळा ५ लाख, सामाजिक सभागृह, मंदीर बांधकाम १ कोटी ६९ लाख ६० हजार, वाॅल कम्पांउंड बांधकाम, स्वागत कमान ८ लाख, सुशोभिकरण ३६ लाख, पुल बांधकाम ३३ लाख असा एकूण ४ कोटी ५६ लाख ६० हजार रूपये निधी इंदापुर तालुक्यातील ग्रामिण भागातील विकास कामांसाठी मंजूर झाला असल्याचे प्रविण माने यांनी सांगीतले.

वरील सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात येणार असुन प्रशासकीय अधिकारी यांचेमार्फत या कामावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर या कामाच्या निविदा शासन स्तरावरून होणार असुन कामे पूर्ण झाल्यानंतर १८ महिण्यापर्यंत ठेकेदारावर निकृृृष्ट कामाबाबत दोषदायीत्व कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. तसेच त्या त्या भागातील कामाचा दर्जा, क्वालीटी बाबत तेथिल नागरीकांनीही दक्ष असणे गरजेचे असुन सर्वात जास्त विकास निधी इंदापूर तालुक्यात व पूणे जिल्ह्यात आणल्याची माहीती प्रविण माने यांनी दीली.

आरोग्यविषयक वृत्त –