माजलगाव नगरपालिका भ्रष्टाचारप्रकरणी मुख्याधिकाऱ्यासह 7 जणांवर FIR

बीड/माजलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – माजलगाव नगर परिषदेला विकास कामासाठी आलेल्या 4 कोटी 13 लाख 947 रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी तत्कालीन मुख्यधिकारी बी.सी. गावित, लक्ष्मण राठोड व सध्याचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टी यांच्यासह सात जणांवर शहर ठाण्यात आज (मंगळवार) पहाटे तीनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 मे 2016 ते 27 मार्च 2019 दरम्यान घडला आहे.

तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी. गावीत, तत्कालीन मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण जनार्दन येलगट्टे, तत्कालीन लेखापाल अशोक भिमराव कुलकर्णी, तत्कालीन लेखापाल आनंद लिंबाजी हजारे, सुर्यकांत ज्ञानोबा सुर्यवंशी, कैलास राजवण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माजलगाव नगर परिषदेतील स्थापत्य अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजलगाव नगर परिषदेला शासनाने विविध योजनेतून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला होता. परंतु तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यासह तत्कालीन लेखापलांनी पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करुन शासकिय अभिलेकामध्ये बनावट नोदणी घेतल्या. 3 लाखापेक्षा अधिक रक्कमेच्या कमाची ई-निविदा कार्यप्रणाली राबवणे बंधनकारक असताना त्यांनी तसे न करता, स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शासकिय रक्कम 4 कोटी 13 लाख 947 रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान हे करत आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/