दुर्दैवी : पावसाने जुना वाडा कोसळून चार जण जागीच ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – परतीच्या पावसाने नेवासा येथे जुना वाडा कोसळून एकाच कुटूंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी (दि. 23) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काशीविश्वेश्वर मंदीरानजीक दुर्देवी घटना घडली. जाफरखान पठाण (वय- 62), उसामा खान पठाण (वय-18), नर्गिस शहाजादे खान पठाण (वय-30) व बेबी रहेमतुल्ला खान पठाण (वय-60) ही मयतांची नावे आहेत.

नेवासा शहरातील नदीकाठी काशीश्वराच्या मंदीरपरिसरात पठाणांचा जुना वाडा आहे. हा वाडा जुनाट झालेला असून देखील यामध्ये अनेक कुटुंब वास्तव्य करीत आहेत. नेवासा शहरासह तालुक्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. रात्री साडेआठच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. याच वेळी या जुन्या वाडाच्या भिंतीमध्ये पावसाचे पाणी मरत राहीले. त्यामुळे रात्री नऊ वाजता वाडा कोसळला. त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे नेवासा शहरात खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com