काश्मीरमध्ये २४ तासात लष्करच्या टॉप कमांडरसह ५ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये मागील २४ तासांपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. बंदिपोर येथील चकमीत लष्कर ए तोयबा चा टॉप कमांडर अली भाईसह २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर शोपीयां जिल्ह्यातील इमाम भागात अजूनही चकमक सुरु असून या ठिकाणी २ ते ३ दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली आहे. येथील सर्च ऑपरेशनदरम्यान एका एसएचओसह २ जवान जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये मागील २४ तासात चार चकमकी झाल्या आहेत. त्यात आतापर्यंत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी बारामुल्ला मध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर शोपियां येथे १ दहशतवाद्याला ठार करण्यात आले. या कारवाईत एका अधिकाऱ्यासह ३ जवान जखमी झाले आहेत. तर अद्याप सुरु असलेल्या चकमकीत एक अधिकारी आणि २ जवान जखमी झाले आहेत.