फिनिक्स मॉलमधून दुचाकी चोरणारे अल्पवयीन जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वाघोली, कल्याणी नगर, फिनिक्स मॉल येथून दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या चार अल्पवयीन मुलांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत.

तपास पथकाचे कर्मचारी  व अधिकारी येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या दुचाकीसंदर्भात तपास करत होते. त्यावेळी सीसीटिव्ही फुटेजवरून मिळालेल्या माहितीनुसार ही चोरी अल्पवयीन मुलांनी केली असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलवून त्याची माहिती दिली. तसेच त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी वाघोली, खऱाडी, फिनिक्स मॉल, येथून एकूण ७ दुचाकी चोरल्याची कबूली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून या दुचाकी जप्त केल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आय़ुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गवारी, सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब बहिरट, कर्मचारी हणमंत जाधव, नवनाथ मोहिते, पंकज मुसळे, नागेश कुंदर, सुनील नागलोत, राहूल परदेशी, समीर भोरडे, अदय पाडोळे यांच्या पथकाने केली.