चोरलेल्या कारमधून ४ अल्पवयीन मुलांचा हजार किमी प्रवास

सिडनी : वृत्तसंस्था – चार अल्पवयीन मुलांनी त्यांच्या पालकांची स्पोर्टस युटिलिटी कार चोरुन तब्बल १ हजार किमीचा प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारी भागात गेलेल्या या मुलांना रविवारी पोलिसांनी अडवले तेव्हा त्यांचा प्रवास थांबला.

क्वीन्सलँडमध्ये कार चालविण्याचा परवाना मिळण्यासाठी वयाची १७ वर्षे पूर्ण झालेली हवीत. या मुलांमध्ये १४ वर्षांचा एक, १३ वर्षांची दोन आणि १० वर्षांची मुलगी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुले रॉकहॅम्पटनच्या सेंट्रल क्वीन्सलँड गावातून निघाले होते व त्यांना न्यू साऊथ वेल्समधील ग्रॅफ्टन गावात अडविण्यात आले. पोलिसांनी त्यांना जेव्हा खडसावले तेव्हा त्यांनी कारची दारे लावून घेतली व बाहेर यायला नकार दिला.

पोलिसांनी निस्सान पेट्रोल व्हेईकलच्या काचा फोडल्या. ही कार चोरीची होती, असे पोलीस म्हणाले. कार चालविण्यात नेमकी किती मुले सहभागी होती याची पोलिसांना माहिती नाही. परंतु त्या सगळ्यांनीच कार चालविली असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

या मुलांनी दोन गावांत गॅसोलाईन स्टेशनवर पैसेही दिले नसल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी न्यू साऊथ वेल्स गावात या मुलांना थांबविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु नंतर तो त्यांनी सोडून दिला.

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like