श्रीनगर : टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून 7 ठार, 25 जखमी

श्रीनगर : वृत्तसंस्था – टेम्पो ट्रॅव्हलर खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (रविवार) जम्मू काश्मिर येथील राजौरीमध्ये घडली. घटना घडली त्यावेळी गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलर शरदा शरीफच्या दिशेने जात होता. दुपारी अडचीच्या सुमारास गाडी थानामंडी येथे आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी 800 फूट खोल दरीमध्ये कोसळली. या घटनेत चार महिला आणि एका अल्पवयीन मुलासह सात जणांचा मृत्यू झाला. तर २५ जण जखमी झाले. जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये 11 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जम्मू येथील सरकारी मेडीकल कॉलेजच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघातात जखमी झालेल्या 14 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एका दांम्पत्याचा समावेश आहे. मोहम्मद पजीर (वय-40) आणि त्याची पत्नी सफीना (वय-33) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. अन्य मृतांची ओळख पटली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like