नोकरदारांसाठी खुपच फायदेशीर आहेत ‘या’ 4 LIC पॉलिसी, जीवन विम्यासोबतच मिळतील लाखो रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या काळात सुरक्षित भविष्यासाठी जीवन विमा (Life Insurance) हा खूप महत्त्वाचा आहे. यात गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर एखाद्या दुर्घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागले की किंवा मृत्यूची घटना घडली तर अशावेळी विमा पॉलिसी (Life Insurance Policy) तुमच्या कुटुंबाचा आधार बनते. जर तुम्ही एकटेच तुमच्या कुटुंबासाठी कमावत असाल तर जीवन विमा पॉलिसी काढणे अतिशय आवश्यक आहे. जाणून घ्या LIC च्या बेस्ट विमा पॉलिसी कोणत्या आहेत.

1) टेक टर्म प्लॅन :
LIC चा टेक टर्म प्लॅन एक ऑनलाइन विमा पॉलिसी आहे. जी ऑफलाइन पॉलिसीपेक्षा स्वस्त आहे. ही एक नॉन-लिंक्ड, विदआउट प्रॉफिट प्योअर प्रोटेक्शन ऑनलाइन टर्म पॉलिसी आहे. या पॉलिसीचा कालावधी 10 ते 40 वर्षापर्यंत असून ही पॉलिसी 18 ते 65 वयोगटातील व्यक्तींना खरेदी करता येईल. यात लाइफ कव्हरची रक्कम 50 लाख रुपये आहे. ही एक नॉन-मेडिकल स्कीम आहे. LIC च्या वेबसाइटवरून थेट या पॉलिसीसाठी अर्ज करता येईल. आवश्यक माहिती भरून तुम्हाला पेमेंट करता येईल. पॉलिसीची कागदपत्रे थेट तुमच्या पत्त्यावर पाठवले जातात.

2) न्यू जीवन आनंद स्कीम :
LIC च्या काही पॉलिसी तुम्हाला जीवन सुरक्षा प्रदान करतात. यामध्ये तुम्हाला बोनसदेखील मिळते आणि पॉलिसी कालावधीनंतर रिस्क कव्हरदेखील सुरू राहतो. 18 ते 50 वर्षांच्या व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकतात. यामध्ये कमीत कमी 1 लाखाचा सम इन्शूर्ड आवश्यक आहे, यापेक्षा जास्त सम इन्शूर्डदेखील तुम्ही घेऊ शकता. पॉलिसीचा कालावधी 15 ते 35 वर्षाचा आहे. ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने ही पॉलिसी घेता येईल. ही पॉलिसी घेतल्यानंतर 3 वर्षांनंतर तुम्ही पॉलिसीमार्फत कर्ज घेण्यासही पात्र राहणार आहेत.

3) जीवन अमर :
LIC ची ही पॉलिसी एक प्योअर टर्म पॉलिसी आहे. यात लाइफ कव्हर निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक लेव्हल इन्शूर्ड आणि दुसरा इन्क्रिसिंग इन्शूर्ड. वयाच्या 80 व्या वर्षांपर्यंत लाइफ कव्हर उपलब्ध आहे. पॉलिसी दरम्यान पाॅलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते. हे एक ऑफलाइन विमा पॉलिसी आहे. केवळ 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोकच ही पॉलिसी घेऊ शकतात. विम्याची किमान रक्कम 25 लाख रुपये आणि रकमेची जास्तीत जास्त मर्यादा नाही आहे. या पॉलिसीची मुदत 18 ते 40 वर्षे आहे.

4) जीवन उमंग पॉलिसी :
ही एलआयसीची जीवन विमा योजना आहे. याला भागीदारी योजनादेखील म्हटले जाते कारण त्याला अंतिम अ‍ॅडिशनल बोनसदेखील मिळतो. यामध्ये प्रीमियम पेमेंट कालावधीनंतर विमाराशीच्या 8 टक्के रक्कम आजीवन किंवा 100 वर्षे वयापर्यंत दिले जाते. यासह प्रीमियम, डेथ बेनिफिट आणि मॅच्युरिटी बेनिफिटवरही टॅक्स बेनिफिट उपलब्ध आहे. निवृत्ती वेतनाधारकांसाठी ही एक उत्तम योजना आहे. यामध्ये भरलेला प्रीमियमवर आयकर कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते. या पॉलिसीमध्ये कर्जाची सुविधादेखील आहे. यामध्ये पॉलिसीची मुदत संपेपर्यंत जोखीम कव्हरेज असते.