रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! आता ‘जेवण’, ‘नाश्ता’ आणि ‘चहा’चे दर वाढले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये सर्वाधिक प्रवास हा रेल्वेनं केला जातो. रेल्वेनं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रवास करताना जास्तीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेसमधील चहा, नाश्ता आणि जेवणाचे दर वाढविण्यात आले आहेत. याबाबत रेल्वे बोर्डाने याबाबत एक परिपत्रक काढलं आहे. तिकीट सिस्टिममध्ये हे नवीन दर 15 दिवसांत अपडेट होतील.

रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे केटरिंग सेवा सुधारण्यासाठी नवीन दर लागू करण्यात आले आहेत. यापूर्वी 2014 मध्ये हे दर बदलण्यात आले होते.

राजधानी, दुरांतो आणि शताब्दी ट्रेनमध्ये लागू करण्यात आलेले नवीन दर –

चहा 10 रुपयांऐवजी 20 रुपये (सेकंड क्लास)
नाश्ता आणि जेवण 80 रुपयांऐवजी 120 रुपये
संध्याकाळचा चहा 20 रुपयांऐवजी 50 रुपये
जेवण 145 रुपयांऐवजी 245 रुपये (फर्स्ट क्लास)
शाकाहारी जेवण 50 रुपयांऐवजी 80 रुपये
एग्ज बिर्याणी 90 रुपयांऐवजी 110 रुपये

Visit : Policenama.com