Coronavirus : ‘कोरोना’मुळं पुण्यात आणखी चौघांचा बळी, जिल्ह्यातील मृत्यूची संख्या 38 वर, ‘ससून’मधील नर्सला बाधा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं संपुर्ण जगभरात हाहाकार घातला आहे. देशातील परिस्थिती देखील बिकट आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, आज (मंगळवार) पुण्यात कोरोनामुळं चौघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत चालू राहणार असल्याचं आजच जाहीर केलं. पुण्यात आज चौघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूची संख्या आता 38 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, ससून रूग्णालयात एका नर्सला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.


कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांमध्ये 3 महिलांचा तर एका पुरूषाचा समावेश आहे. ते सर्व कोरोना पॉझिटिव्ह होते तसेच त्यांना इतर आजार देखील होते. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कालच (सोमवार) प्रशासनानं शहरातील आणखी 21 परसिर सीलबंद करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळं आज चौघांचा मृत्यू झाल्यानं पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान, ससून रूग्णालयात कोरोनाबाधित नर्सला आयसोलेशेन वॉर्डमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती ससून रूग्णालयाचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली आहे.