मधुमेही रूग्णांनी जरूर खाव्यात ‘या’ 4 गोष्टी, शुगर लेव्हल नेहमीच कंट्रोलमध्ये राहील, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : डायबिटीजच्या रूग्णांना प्रत्येक गोष्ट खूप पारखून खावी लागते. यामागील कारण म्हणजे आहारातील थोडासाही निष्काळजीपणा रक्तातील साखरेची पातळी वाढवतो. अशा परिस्थितीत आपण प्रथम आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असणे सर्वात महत्वाचे आहे. ज्या पद्धतीने डायबिटीजच्या रूग्णांना गोड पदार्थ हे विष प्रमाणे असतात. अगदी त्याचप्रमाणे दररोजच्या रुटीनमध्ये काही अशा गोष्टी आहेत त्यांमध्ये स्टार्च असतात. स्टार्च असणाऱ्या भाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. जरी कार्बोहायड्रेट शरीरातील उर्जा वाढवतात, परंतु शुगरच्या रुग्णाच्या आरोग्यासाठी ते धोकादायक असतात. आज अशा 4 गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्यात स्टार्च अजिबात नसतात आणि डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे खाणे फायदेशीर असते.

भेंडी

सध्या बाजारात भेंडी मोठ्या प्रमाणात येत आहे. भेंडी डायबिटीज रूग्णांच्या आरोग्यासाठी चांगली असते. भेंडीत विद्रव्य फायबर असतात ज्यामुळे ती सहज पचते. याबरोबरच साखर नियंत्रित ठेवते. भेंडीमध्ये उपस्थित घटक इन्सुलिनचे उत्पादन वाढवतात.

काकडी

काकडी देखील डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. आजकाल बाजारात प्रत्येक हंगामात काकडी येते. अशा परिस्थितीत जर शुगर असणाऱ्या लोकांनी दररोज काकडीचे सेवन केले तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. काकडीमध्ये स्टार्च अजिबात नसतात, यामुळे काकडी ब्लड शुगर नियंत्रित करते. काकडीचा फायदा हा देखील आहे की त्यात 90% पाणी असते, त्यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक देखील लागत नाही.

गाजर

गाजरमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. यासह त्यात व्हिटॅमिन ए आणि अनेक मिनरल्स असतात. अशा परिस्थितीत डायबिटीजच्या रुग्णांनी गाजर शिजवून न खाता कच्चे खावे.

पानकोबी

आजकाल घरगुती भाजी असो की जंक फूड असो, त्यामध्ये कोबी नेहमीच वापरली जाते. कोबीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात, जे डायबिटीजच्या रुग्णांसाठी चांगले आहे.