काँग्रेसचा भाजपला थेट सवाल, म्हणाले – ‘मोदी सरकारने भाजपशासित राज्यांना महाराष्ट्रातील लोकांना मारण्याचा परवाना दिलाय का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात तिसरी लाट येण्याचा इशारा तज्जांनी दिला आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार आणि भाजपात आरोप- प्रत्यारोप सुरुच आहेत. नागपूरला येणारे ऑक्सिजन सिलेंडर गुजरातला पळवण्याचा डाव नुकताच उधळून लावण्यात लावण्यात आला आहे. यावरून कॉंग्रेसने परखड सवाल उपस्थित केला आहे. मोदी सरकारने देशातील भाजपाशासीत राज्यांना महाराष्ट्रातील लोकांना मारण्याचा परवाना दिलाय का? फडणवीसांना हे दिसत नाही का? असा सवाल काँग्रेसने फडणवीसांना विचारला आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑक्सिजनला तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. पण कर्नाटकमधून येणारा ऑक्सिजनचा साठा केंद्राने थांबवला आहे. ही बातमी ताजी असताना नागपूरला जाणारे ऑक्सिजनचे सिलेंडर हे गुजरातला पळवण्यात येत होते. अधिकची रक्कम मिळाल्याने ऑक्सिजन पुरवठा करणा-या कंपनीने परस्पर हे टॅंकर अहमदाबादला वळवले होते, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान काल पश्चिम महाराष्ट्राचे टॅंकर्स कर्नाटक सरकारने रोखले. त्यानंतर नागपुरचे ऑक्सिजन टॅंकर्स गुजरातला नेण्याचा डाव उघडकीस आला. त्यामुळे ही बाब फडणवीसांना दिसत नाही, का अशी विचारणा कॉंग्रेसने केली आहे.