रस्तालूट करणारी चौघांची टोळी जेरबंद ; नगर ‘एलसीबी’ची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – इमामपूर घाटात वाहन चालकांना लुटणाऱ्या टोळीतील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. इतर दोन साथीदार फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आज ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच चोरट्यांकडून गुन्ह्यात चोरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.

अटक केलेल्यांमध्ये परशुराम उर्फ प्रशांत मोहन गायकवाड (वय- १९ वर्षे, रा. एकनाथवाडी, ता- पाथर्डी, जि- अ.नगर, ह. रा. साईनगर, आकाशवाणी, बीड), ईस्माइल अमीर शेख (वय- ३५ वर्षे, रा. संजयनगर, गेवराई, जि. बीड), तुकाराम अशोक पांचाळ (वय- २९ वर्षे, रा. पैठण, ता- केज, जि- बीड), रामेश्वर प्रल्हाद लाटे (वय- ३५ वर्षे, रा. ग्रामसेवक कॉलनी, बीड, मूळ रा. वेल्लोरा, ता-जि- बीड) ही अटक केलेल्यांची नावे आहेत.

दि. २४/०५/२०१९ रोजी कृष्णात मारुती कणसे (वय- ४५ वर्षे, धंदा- सरकारी नोकरी, प्राचार्य
भूमि अभिलेख, मूळ रा. अंगापूर, ता.जि. सातारा, ह.रा. औरंगाबाद) हे त्यांचे मालकीची हुंडाई क्रेटा एसएएक्स कार नं. एमएच-५०-एल-४८४९ ही मधून औरंगाबाद-नगर रोडने सातारा येथे जात असताना सायंकाळी ७/१५ वा. चे सुमारास ईमामपूर घाट, दुस-या वळणावर आले असताना पाठीमागून सफेद रंगाचे इंडीका कारमधून आलेल्या अनोळखी इसमांनी फिर्यादीची कार अडवून फिर्यादीस गाडीला कट का मारला, असे म्हणून दगडाने फिर्यादीचे कारच्या काचा फोडल्या. मारहाण करुन फिर्यादीजवळील हुंडाई क्रेटा कार नं. एमएच-५०-एल-४८४९, गोल्डन फ्रेमचा गॉगल, व अ‍ॅपल आयफोन असा एकूण १०,३५,०००/-रु. किं. चा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे
पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फतीने समांतर तपास करीत असताना पथकातील पो.ना. सुनिल चव्हाण यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली कि, सुमारे तीन आठवड्यापुर्वी एमआयडीसी पो.स्टे. हद्दीमध्ये असणाऱ्या पांढरी पुल येथून क्रेटा कार चोरी झालेली असून चोरी करणारे इसम सदर कारसह बिड जिल्ह्यातील कालिकानगर भागात चोरी केलेल्या कारला एमएच-१२-पीएन-९९५५ हा बनावट क्रमांक लावून फिरत आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, पोना सुनिल चव्हाण, भागीनाथ पंचमूख, आण्णा पवार, रविन्द्र कर्डिले, विश्वास बेरड, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, चालक बबन बेरड अशांनी मिळून बिड येथे जावून मिळालेल्या बातमीनूसार, कालिकानगर परिसरात सापळा लावून कार नं. एमएच-१२-पीएन-९९५५ ला घेराव घालून सदर कारमध्ये असलेल्या इसमांची चौकशी केली.

सदर इसमांना गाडीचे कागदपत्राबबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून कागदपत्रे नसल्याचे सांगीतले. त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता इसम नामे परशूराम उर्फ प्रशांत मोहन गायकवाड याने सांगीतले कि, मागील एक महीण्यापुर्वी मी व माझे वरील नमुद साथीदार तसेच गणेश मोतीराम गायकवाड (रा. ग्रामसेवक कॉलनी, बीड) भिमा सादू लवांडे (रा. सदर) अशांनी मिळून माझे दाजी दत्ता श्रीमंत जाधव यांचे मालकीचे इंडीका व्हीस्टा कार नं. एमएच-४८-एफ-०४६८ मध्ये बसून येवून अहमदनगर ते औरंगाबाद हायवे रोड वरील क्रेटा कारचा नेवासा फाटा येथून पाटलाग करुन ईमामपूर घाटामध्ये क्रेटा कारला कट मारुन सदरची कार थांबवून ड्रायव्हर बाजूचे दरवाजाची काच दगडाने फोडून क्रेटा कारचे चालकाला बाहेर ओढून त्यांस मारहाण करुन रोडवर ढकलून देवून सदरची कार बळजबरीने चोरुन घेवून नगरचे दिशेने निघालो.

परंतु पुढे टोलनाका असल्याची माहीती मिळाल्याने मी क्रेटा कार मध्येच पाठीमागे वळवून पुन्हा औरंगाबाद दिशेने एका ट्रकचा आसरा घेवून मिरी रोडने तीसगाव पाथर्डी मार्गे बीड येथे घेवून आलो असल्याचे सांगितले. सदर क्रेटा कारची ओळख पटू नये म्हणून सदर क्रेटा कारला मी दुस-या क्रेटा कारची एमएच-१२-पीएन-९९५५ ही बनावट नंबर प्लेट लावून सदरची कार आम्ही वापरत असल्याचे सांगीतले.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?