हॅन्ड सॅनिटायजरला अधिक सक्रिय बनवतात ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या कसा करतो कीटाणूंचा ‘सर्वनाश’

पोलीसनामा ऑनलाइन – चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेला कोरोना व्हायरसने पूर्ण देश अडचणीत असून भारतातही दररोज या व्हायरसच्या संक्रमणाचे एक तरी प्रकरण समोर येत आहे. डॉक्टर आणि आरोग्य तज्ञ यापासून बचाव करण्यासाठी स्वच्छता ठेवण्याचा सल्ला देतात. विशेषकरून हातांची स्वच्छता जास्त आवश्यक आहे. साबणाने अनेकदा हात धुणे शक्य होत नाही. अशात सॅनिटायझर उत्तम पर्याय आहे. पण कधी याचा विचार केला आहे कि सॅनिटायझरला प्रभावी कसे केले जाते? जाणून घ्या सॅनिटायझर कसे करतो किटाणूंचा नाश…

लिंबूरस किंवा सुगंधी तेल
हॅन्ड सॅनिटायझर बनवण्यासाठी त्यात अल्कोहोलचा वापर करतात. अल्कोहोलचा वास कमी करण्यासाठी त्यात लिंबाचा रस किंवा लवंगीचे तेल सारख्या सुगंधी तेलाचा वापर केला जातो. सुंगध वाढवण्यासाठी अत्तर शिंपडले जाते. यामुळेच सॅनिटायझरचा वापर करताना सुगंध येत राहतो.

बेन्झाल्कोनियम क्लोराइड
बेन्झाल्कोनियम क्लोराइड हे एक अँटीसेप्टीक एजंट आहे, जे विषाणूंना संपवण्याचे काम करते. जर सॅनिटायझर लावल्यानंतर हाताला थोडी जळजळ झाली तर ती या केमिकलमुळे होते, बेन्झाल्कोनियम क्लोराइडचा उपयोग अनेक औषधे तयार करण्यात होतो.

ट्रायक्लोसन
हे एक प्रकारचे केमिकल आहे, जे हॅन्ड सॅनिटायझरमध्ये वापरले जाते. हे केमिकल हाताच्या त्वचेला शोषून घेत आत जाते आणि विषाणूंना नष्ट करते. अशात याचा वापर चीनमध्ये चार वेळा केला जाऊ शकतो. याच्या जास्त वापराने हात कोरडे पडू शकतात.

फॅथलेटस
हे एक केमिकल आहे, जे सुगंध वाढवण्याचे काम करते. या केमिकलला सॅनिटायझरमध्ये सुगंध वाढवण्यासाठी टाकले जाते. या केमिकलचे प्रमाण निश्चित असले पाहिजे. काही संशोधनात हे समोर आले आहे की, फॅथलेटसचे जास्त प्रमाण यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसं आणि पुनरुत्पादक प्रणालीस हानी पोहोचवू शकते. याचा जास्त वापर गर्भवती महिलांसाठी हानिकारक आहे.