धक्कादायक! रुग्णालयात घुसून रुग्णाची गोळीबार करुन केली ‘हत्या’

मदुराई : वृत्त संस्था – चार हत्यारबंद हल्लेखोरांनी हॉस्पिटलमध्ये शिरुन गोळीबार करीत एका रुग्णाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मदुराई येथील राजाजरी सरकारी रुग्णालयात हा प्रकार सोमवारी सकाळी ७ वाजता घडला.

याबाबत प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितल्यानुसार सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चार जण हॉस्पिटलमध्ये शिरले. त्यांच्याजवळ पिस्तुल होते. त्यांनी एका रुग्णावर गोळीबार करुन त्याची हत्या केली. त्यानंतर ते पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.