कौतुकास्पद ! 4 वर्षाच्या चिमुकल्याची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत,सायकल खरेदीसाठी जमवले होते पैसे

विजयवाडा : वृत्तसंस्था – देशात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच लॉकडाउनच्या निर्णयामुळे हातावरचे पोट असणाऱ्या व्यक्तींचा रोजचा खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारला परिस्थिति नियंत्रणात आणण्यासाठी देखील मोठी कसरत करावी लागत आहे .मात्र काही दानशूर व्यक्ती मदतीचा हात पुढे करताना पाहायला मिळत आहेत. मंगळवारी आंध्र प्रदेशातील एका ४ वर्षाच्या चिमुकल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली आहे. ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून मदत करणाऱ्या या चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

४ वर्षीय चिमुकल्या हेमंत ने आपली पॉकेट मनी दान केली आहे. सायकल घेण्याकरिता हेमंत ने ९७१ रुपये जमा केले होते.
मुले हट्टी असतात, त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी दुसर्‍या कोणासही द्यायच्या नसतात… पण या प्रकरणात हेमंत वेगळा आहे. त्याने हे पैसे ताडेपल्लीतील वायएसआर कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात राज्यमंत्री पेरणी व्यंकटारामिया यांच्याकडे दिले आहेत .

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या ८९१ वर

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी सकाळी २३ नव्या कोरोना बाधितांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ८९१ वर पोहचली आहे. त्यात मुंबईतील १०, पिंपरी-चिंचवडमधील ४ जणांचा समावेश आहे. अहमदनगर ३, नागपूर २, सांगली व ठाणे येथे प्रत्येकी एक नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.