चार वर्षीय चिमुकलीवर कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

मेंदू हा मानवी शरीरातील अतिशय महत्वाचा भाग . एका चार वर्षीय मुलीच्या मेंदूची कवटी एका अपघातामध्ये निकामी झाली होती. त्यामुळे तिचे आयुष्य पणाला लागले होते. परंतु पुण्यात या मुलीवर कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आणि या मुलिची मृत्यूच्या दाढेतून सुटका करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे भारतातील पहिलीच कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cc4faf41-cc59-11e8-b037-7379b887f70f’]

४ वर्षांच्या या चिमुकलीला एका चारचाकी वाहनानं धडक दिली होती. या अपघातात तिच्या डोक्याला प्रचंड मार बसला होता. तिला रुग्णालयात नेईपर्यंत डोक्यातून भरपूर रक्त वाहून गेलं होतं. तिच्या मेंदुच्या आजुबाजूची ६० टक्के कवटी पूर्णपणे निकामी झाली होती. तिच्या कवटीतील हाडांना अनेक जखमा झाल्या होत्या. ती जगेल की नाही याचीही डॉक्टरांना शंका होती.

[amazon_link asins=’B01G5I8YLC,B07BCGC13F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d85a43b2-cc59-11e8-abf3-b9be6e64ac16′]

पण डॉक्टरांनी हार मानली नाही. चिमुकलीला वाचवण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. सर्वप्रथम तिच्या मेंदुला धक्का पोहोचणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली. काही न्यूरोसर्जन्सनी तिच्या मेंदूजवळची जखमी हाडं अलगदपणे काढून टाकली. ही हाडं काढताना तिला कुठेही जखम होऊ दिली नाही. यामुळे मेंदूला इजा होण्याचा धोका टळला. पण डोक्यासाठी नवीन कवटी बसवणं गरजेचं होतं. त्यामुळे अमेरिकेतून खास एक कृत्रिम कवटी मागवण्यात आली. दोन ते तीन किचकट शस्त्रक्रिया करून ही कवटी तिच्या डोक्यात बसवण्यात आली. या सगळ्यात दीड वर्षाचा काळ गेला. पण आता त्या चिमुकलीचं आयुष्य पुर्ववत झालं आहे.

[amazon_link asins=’B078RKPPGP,B00KJI2GIM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f81dfab0-cc59-11e8-b83d-114cfcf44197′]

आज घटनस्थापना : नवरात्रोत्सवासाठी सजले अंबाबाईचे मंदिर

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आजपासून सुरू होत आहे. यासाठी कोल्हापूरमधील प्रसिद्ध अंबाबाई मंदिराला आकर्षक आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला अंबाबाईचे मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. अंबाबाई मंदिर आवारातील दीपमाळा, मंदिराची पाच शिखरे, गरूड मंडप परिसर आणि संपूर्ण मंदिराभोवतीच्या शिल्पाकृतींची स्वच्छता पूर्ण झाली आहे.

मुख्य मंदिरातील गाभारा व गर्भकुडीसह महालक्ष्मी यंत्र स्थानाची स्वच्छताही झाली आहे. उत्सवासाठी मंदिराच्या ५ शिखरांपासून ते दीपमाळा व गरूड मंडपाच्या छतावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कारंजा चौकातील दिवेही सुरू करण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला अंबाबाई मंदिर उजळून निघाले होते. सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर त्यासाठी सुद्धा प्रशासनाने उपाययोजना करून ठेवली आहे. भाविकांना ऊन्हाचा त्रास होवू नये यासाठी दर्शन मंडपाला संपूर्ण पांढरे कापड लावण्यात आले आहे. दर्शन रांगेतच भाविकांना पाणी देण्याची सोय काही स्वयंसेवी संस्था करणार आहेत. शिवाय तांत्रिक सुविधा, सुरक्षा यंत्रणेची अंतिम तपासणी सुद्धा देवस्थान समितीकडून करण्यात आली आहे. उत्सवादरम्यान भविकांना लवकर दर्शन मिळावे यासाठी सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.