केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर, पंतप्रधान मोदीनी घेतली कलाकारांच्या मागणीची दखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर कररण्यात आले आहे. केंद्र सरकाने महाराष्ट्रासाठी हे केंद्र मंजूर करून राज्यातील कलाकारासाठी दिवाळीची एक गोड भेटच दिली आहे. राज्यात हे केंद्र व्हावे यासाठी तब्बल 40 वर्षे संघर्ष करणाऱ्या कलाकारांच्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. त्यानुसार राज्यातील पिंपरी – चिंचवड मध्ये हे केंद्र विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. याकरिता पिंपरी महापालिकेने बालविकास केंद्राची जागा देण्याची आपणहून तयारी दर्शवली आहे.

देशातील विविध राज्यांमध्ये ललित कला अकादमीची केंद्रे आहेत. मात्र महाराष्ट्रात अशाप्रकारचे केंद्र नव्हते. राज्यात देखील असे केंद्र व्हावे या मागणीसाठी राज्यातील चित्रकार, शिल्पकार, यांनी दिल्ली येथे तब्बल 40 वर्षे आंदोलन, उपोषण, मोर्चे यामध्यमातून संघर्ष केला. अखेर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पिंपरी- चिंचवड येथे हे केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती ललित कला अकॅडमी, दिल्लीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे दिली. ते म्हणाले, महाराष्ट्राला कलेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. मात्र तरीही कलेकडे उपेक्षित दृष्टीकोनातून पाहिले जाते. कलेसंदर्भातील शिष्यवृत्तीसाठी कलाकारांना मद्रास किंवा दिल्ली येथे जावे लागते. त्यामुळे कलाकारांचे शिक्षण थांबते. याकरिता महाराष्ट्रात ललित कला अकादमीचे केंद्र व्हावे अशी आमची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अनेक सरकार आली मात्र केवळ आश्वासनेच मिळाली. पण मोदी यांनी आमच्या मागणीची दखल घेतली आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी पिंपरी- चिंचवड येथे केंद्रास मंजुरी दिली आहे. पिंपरी महापालिकेने बालविकास केंद्राची जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. राज्य शासनाच्या परवानगीनंतर सरकार ललित कला केंद्राबरोबर करार करून लवकरच जागा हस्तांतर प्रक्रियेला सुरुवात करणार आहे.

You might also like