आता ‘रामायण’वर बनणार 400 कोटींचा सिनेमा ! ‘या’ बड्या फिल्ममेकरचा ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात लॉकडाऊन आहे. अशात अनेक जुन्या काळातील मालिका रिपीट टेलीकास्ट केल्या जाताना दिसत आहेत. अशा अशी माहिती समोर आली होती की, रामानंद सागर यांच्या रामायण या रिपीट टेलीकास्ट मालिकेनं तर सर्व टीआरपी रेकॉर्ड तोडले आहेत. अशात आता असं समजतंय की रामायण नावाच्या सिनेमावर वेगानं काम सुरू झालं आहे.

दंगल फेम डायरेक्टर नितेश तिवारी प्रोड्युसर मधु मंटेना मिळून आता रामायणावर सिनेमा तयार करणार आहेत. या सिनेमाबद्दल गेल्या वर्षीपासूनच चर्चा सुरू होती. आता लॉकडाईऊनमध्ये यावर कामही सुरू झालं आहे. खुद्द नितेशनं याबाबत माहिती दिली आहे. प्रोजेक्टबद्दल त्यानं बरीच माहिती दिली आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, नितेशनं सांगितलं की, “जशी मला याची जाणीव झाली की, लॉकडाऊन लाँग टाईम चालणार आहे तेव्हा मी माझ्या रायटर सोबत मिळून यावर काम सुरू केलं आहे. आम्ही फेसटाईपच्या माध्यमातून याची स्क्रिप्ट तयार करत आहोत.”

या सिनेमात मधु मंटेनासोबतच अल्लू अर्जुन आणि नमिल मल्होत्रा प्रोड्युस करत आहेत. नितेश आणि रवी उद्यावर हे मिळून डायरेक्शनची धुरा सांभाळत आहेत. तीन भागात बनणारा हा प्रोजेक्ट 400 कोटींच्या बजेटमध्ये तयार केला जाणार आहे असंही नितेशनं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

सिनेमा कधीपर्यंत येणार हे सांगताना नितेशनं सांगितलं की, हे आता सांगणं थोडं अवघड आहे. सध्या जी स्थिती आहे ती पाहून जवळपास सर्वच प्रोजेक्ट 4 महिने मागेच राहतील.”