खासगी क्लासेसवर लवकरच निर्बंध !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती, शौचालय बांधणी व भौतिक सुविधांसाठी ४०० कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. शुक्रवारी विधानसभेत त्यांनी ही माहिती दिली. शिक्षण विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना शिक्षण मंत्री शेलार यांनी शालेय शिक्षणाविषयी माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वच स्तरातील मुलं शिक्षण घेतात. प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक लहान मुलाचा मूलभूत हक्क आहे. तो हक्क देणं हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकारने ४०० कोटी रुपयांचा निधी अनुदानाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच ग्राम विकास विभागातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

खासगी क्लासेसवरही लवकरच निर्बंध

सध्या खाजगी क्लासेसवर कोणतेही निर्बंध नाहीत. या क्लासेसकडून काही वेळा विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा खाजगी क्लासेसवर सरकारचे नियंत्रण असावे अशी मागणी बरीच दिवस सुरु होती. राज्य सरकार त्या दृष्टीने पाऊले टाकण्याच्या तयारीत आहे. खाजगी ट्युशन क्लासेसवर निर्बंध आणणारा कायदा तयार करण्यासाठी गठीत केलेल्या कमिटीने कायद्याचा मसूदा तयार केला असून महिनाभरात तो हरकती व सूचनांसाठी घोषित करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली.

अभिनेत्री प्राजक्ता माळीला ठाणे कार्टाकडून दुसरं ‘समन्स’

‘या’ ५ टॉप अभिनेत्रींचं होतं अंडरवर्ल्डशी ‘कनेक्शन’, एकीचं तर नशीबच ‘फुटलं’

मराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’

भावाच्या खुनप्रकरणी शिक्षा झालेल्यांकडून दलित तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण

पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार