आरोग्य शिबिरात ४०० रुग्णांची तपासणी

पोलीसनामा ऑनलाईन – चोपडा, जळगाव येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे पाटील गढी, शेखपुरा भागात महीला आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिराचे उद्घाटन माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी व तालुक्यातील शहरातील मान्यवरांचा उपस्थीतीत करण्यात आले.

या शिबिरात ४०० रुग्णांना औषधी वाटप करण्यात आली. या शिबीरात डॉ. पवन पाटील, डॉ. संजय जाधव, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सुकदेव गुजर, डॉ. वैशाली पाटील, डॉ. अर्चना पाटील, यांनी रुग्नांची तपासणी केली. यावेळी पीपल्स बॅकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी उपस्थित होते. शिबिराचे यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी कॅाग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष धमेंद्र मगरे, डॉ. सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. कांतीलाल पाटील यांनी प्रयत्न केले.