अहमदनगर मनपा निवडणूकित ४०० जणांच्या विरोधात तडीपारीचे आदेश 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातील तब्बल ४०० जणांवर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील महापालिका निवडणुक जवळ आली आहे. दरम्यान १ नोव्हेंबरपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यातील तब्बल 400 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आणि प्रभारी महापालिका आयुक्त राहुल द्विवेदी यांनी महापालिका निवडणुका आधी जिल्हाधिकाऱ्यांरी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती या दरम्यान सांगितले आहे.

विशेष म्हणजे जवळपास सर्वच पक्षातील अनेकांची नावे जिल्ह्यातील ४०० जणांच्या हद्दपारीची कारवाईत आहेत. इतकेच नव्हे तर हद्दपारीच्या यादीत जर निवडणूक लढवणारा उमेदवार असला तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. असेही  जिल्हाधिकारी आणि प्रभारी महापालिका आयुक्त राहुल द्विवेदी यांनी  स्पष्ट केले आहे.

९ डिसेंबर रोजी अहमदनगर महापालिकेच्या ६८ जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच १० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान पोलिस अधिकारी, दंडाधिकारी व मनपा अधिकाऱ्यांच्या आचारसंहिता अंमलबजावणीसाठी चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत.