‘कोरोना’मुळे चीनमध्ये 41 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जीवघेण्या कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू लागल्याने जगभरातच अलर्ट देण्यात आला आहे. कोरोनाचा पहिला संसर्ग चीनमधील वुहान प्रांतात आढळला. बघता बघता चीनमधील तेरा शहरे कोरोना तापाच्या तडाख्यात सापडली आहेत. आज प्रसिध्द झालेल्या आकडेवारीवरून चीनमध्ये एक हजार संशयित रुग्ण असून ४१ जण मरण पावले आहेत. गेल्या दोन दिवसात कोरोनाचे १८० नवे रुग्ण दाखल झाल्याने सरकारची काळजी वाढली आहे.

फ्रान्समध्ये तीन जणांना कोरोनाची बाधा झाली असून तिथेही चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. भारतातही तपासणी कडक करण्यात आली आहे. थायलंड, व्हिएटनाम, सिंगापूर, तैवान या देशातही कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण तुरळक संख्येने आढळले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –