41 विद्यार्थ्यांना मिळाले थेट IIT प्रवेश परीक्षा – JEE अडव्हॉन्सचे तिकीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या जेईई मुख्य परिक्षेच्या पहिल्या टप्प्याचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा एजेन्सी (एनटीए) ने पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे आयोजन ७ ते ९ जानेवारी दरम्यान केले होते. या परिक्षेत ९ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेटाइल मिळविले आहे.

एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी सांगितले की, या परीक्षेला ९ लाख २१ हजार २१६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यापैकी ८ लाख ६९ हजार १० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. दुसरी आणि शेवटच्या टप्प्यातील जेईई परीक्षा ५ ते ११ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. त्यासाठी फेब्रुवारीत अर्ज दाखल करता येणार आहे.

महाराष्ट्रातील वेदांग धीरेंद्र असगोंकर याने ९९.९९ आणि गोव्यातील सिद्धांत गोवेकर याने ९९.९१ पर्सेटाइल मिळवून जेईई अ‍ॅडव्हान्स परिक्षेसाठी पात्र ठरले आहेत. पहिल्या टप्प्यातील परीक्षेत १०० पर्सेटाइल मिळविणाऱ्यांमध्ये लंडा जितेंद़, थडावर्थि विष्णु श्री साई शंकर(आंध्र प्रदेश), निशांत अग्रवाल (दिल्ली), निशाग्र चढ्ढा (गुजरात), दिव्यांशु अग्रवाल (हरियाना), अखिल जैन, पार्थ द्विवेदी (राजस्थान), रोंगाला अरुण सिद्धार्थ, चग्री कौशल कुमार रेड्डी (तेलंगणा) यांचा समावेश आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like