शिवजयंतीदिवशी श्रीपाद छिंदमसह ४१७ जणांना शहरबंदी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवजयंतीनिमित्त शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्यासह ४१७ जणांना बंदी लागू करण्यात आली आहे. दोन दिवस त्यांना शहरात वास्तव्य करता येणार नाही, असा आदेश प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी जारी केला आहे.

कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ४१७ समाजकंटकांना शिवजयंतीच्या दिवशी शहर बंदी लागू करावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने पविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. प्रांताधिकार्‍यांनी सदर प्रस्ताव मान्य करून ४१७ जणांना शिवजयंती काळात शहरबंदी लागू केली आहे. यात नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे.

शहरबंदी केलेल्यांमध्ये नगरसेवक सुनील त्रिंबके, बाबसाहेब गाडळकर, धनंजय गाडे, संजय उर्फ काका गाडे, भूपेंद्र परदेशी, मयूर काटरिया, सिध्दार्थ शेलार, काशिनाथ शिंदे, वैभव म्हस्के, सागर ठोंबरे, सागर डोंगरे, विकास झरेकर, किशोर रोहकले, सय्यद खोजा,अवधूत जाधव, अंकुश मोहिते, अवधूत कासाद, रमेश शिंदे, शुभम राजुघोळ, मयूर कुलथे, धीरज उर्कीडे, अंकुश चत्तर, दत्तात्रय तापकिरे, विशाल सूर्यवंशी, बबुल सूर्यवंशी, कुलदीप भिंगारदिवे, फारूक अब्दुल रंगरेज, सागर अस्वर, धनशाम बोडखे, इम्रान जानसाब शेख, सचिन गवळी, दीपक वाडेकर, गिरीश गायकवाड, अनिकेत चव्हाण, अनिल राऊत, सय्यद असिफ, सय्यद अर्शिद अकबर, आवेश जब्बार शेख, राहुल चिंतामणी, शरीफ, शादब सय्यद, गजेंद्र ससे, किरण पिसोरे, राहुल शर्मा, सत्यजित ढवण, अशोक रोकडे, सय्यद अब्दुल वाहीब अब्दुलहमीद, चेतन चव्हाण, चंद्रकांत औशिकर, मन्सूर सय्यद, मनीष फुलडाहळे, संदीप जाधव, सुरेश मेहतानी, बीरदिल दारसिंग अजयसिंग, शिव शिरसाठ, अरविंद शिंदे, जॉय लोखंडे, संजय दिवटे, शिवाजी दहीहंडे, शंकरराव गवळी, रमेश शाम परदेशी, अजय परदेशी, दत्ता खताडे, शाम घुले, संदीप हजारे, बाबा उर्फ संतोष नामदे, लोंढे उर्फ प्रविण सपकाळ, रवी नामदेव नामदे, लोंढे उर्फ प्रवीण सपकाळ, अतुल शंकर गुलदगड, वैभव ढाकणे, सागर बबन शिंदे, अक्षय डोके, महेश बुचूडे, वैभव दारूकुंडे आदींचा समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us