अबब …! उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सापडला आतापर्यंतचा सर्वात मोठा मासा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन

सोलापुरातील उजनी धरण आणि त्याचे पाणलोट क्षेत्र म्हणजे हजारो मच्छिमारांचे उपजीविकेचे साधन आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या तीन तरुणाने टाकलेल्या जाळ्यात तब्बल 42 किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला. उजनी धरण क्षेत्रात आजपर्यंत आढळलेला हा सर्वात मोठा असल्याचे सांगितलं जात आहे.

नितीन काळे, सुदाम चव्हाण आणि अक्षय चव्हाण या मच्छिमारांच्या जाळ्यात हा मासा अडकला. त्यांनी हा मासा आज इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील उपबाजारात विक्री करण्यास आणला होता. माशाची काही वेळातच 130 रुपये किलो या दराने 5500 रुपयांनी शंकर मोरे या खरेदीराने खरेदी केला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92f96e5e-cba6-11e8-90f1-a7e43d427bc4′]

उजनी धरण पाणलोट क्षेत्र हे मासेमारी करण्यासाठी सर्वात मोठे क्षेत्र आहे. हजारो मच्छिमार या ठिकाणी मासेमारी करुन आपली उपजीविका करतात. मासे मोठ्याप्रमाणावर मिळत असल्याने इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील मासेमारीत सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे.

मोठा मासा विक्रीला आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी या ठिकाणी भेट देऊन या माशासंदर्भात माहिती घेतली.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B07D6NXR2Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9d295ec-cba6-11e8-9dc2-05b2b08867bb’]

उजनी धरण पाणलोट क्षेत्र

पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यात भीमानगर या गावाजवळ, भीमा नदीवरचे हे एक मोठे धरण आहे. याचे पाणी पुढे नीरा-नृसिंहपूर येथे नीरा नदीला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव व एकच धरण उजनी धरणाला ‘यशवंतसागर’ असेही संबोधले जाते.

क्षमतेच्या बाबतीतला या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्याआधी पहिला लागतो. या धरणात पोचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक नद्यांमधून येते. एवढी मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो. या धरणाच्या जलाशयास यशवंतसागर म्हणतात. फ्लेमिंगो (रोहित) हा परदेशी पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो.

[amazon_link asins=’B07C2ZW7ZB,B078LVWLJX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bba173f0-cba6-11e8-87d1-ebafef25840e’]