Coronavirus : धारावीत ‘कोरोना’चा हाहाकार, 24 तासात 42 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आशिया खंडतील मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या धारावीत कोरोनाची वाढती संख्या हि सरकारसमोर मोठी डोकेदुखी ठरत आहे. धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवणे मुंबई महापालिके समोर मोठे आव्हान आहे. धारावीत आज 42 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. आज 4 कोरोनाग्रस्तांनी आपले प्राण देखील गमावले. आत्त्तापर्यँत धारावीत 330 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तसेच आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे येथे संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे

धारावीत 10 लाख झोपड्यांमध्ये तब्बल 12 लाख नागरिक राहतात. त्यामुळे येथे कोरोनाने एकदा का आपला जम बसवला तर परिस्थिती हि गंभीर होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाकडून धारावीसाठी जास्तीत जास्त उपाययोजना करण्यात येत आहेत.

मुंबई महापालिकेकडून येथील रुग्ण संख्या वाढू नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. सध्या धारावीतील अनेक भागांमध्ये हॉटस्पॉट बनले आहेत.