पिंपरी-चिंचवडमध्ये सापडली ४३ जिवंत काडतुसे

पिंपरी-चिंचवड | पोलीसनामा आॅनलाइन – परिसरातील एम्पायर इस्टेट चिंचवड जवळील ब्रिज खालील रेल्वे लाईनच्या कडेला एका लाल रंगाचा कापडी पिशवीमध्ये ४३ जिवंत काडतुसे कचरा वेचक महिलेला सापडली आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी संबंधित जिवंत काडतुसे ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सात च्या सुमारास एका ५८ वर्षीय कचरा वेचक महिलेला कचरा गोळा करत असताना एम्पायर इस्टेट चिंचवड जवळील ब्रिजखालील रेल्वे लाईनच्या कडेला लाल रंगाच्या कापडी पिशवीमध्ये तब्बल ४३ जिवंत काडतुसे सापडली. यामुळे महिला घाबरली होती. यासंबंधी महिलेने पिंपरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन भेट दिली. पिशवी मध्ये एकुण ३०३ चे २६ जिवंत काडतुसे त्यावर इंग्रजीमध्ये KF ९९ असे लिहिलेले आहे. तर १० नग सिल्व्हर रंगाचे बाराबोर २.२ त्यावर इंग्रजीमध्ये MADE IN BELGIUM १२ असे लिहिलेले आहे. ०७ नग लाल रंगाचे बाराबोर त्यावर इंग्रजीमध्ये WESTERN SUPER NO १२ MADE IN USA असे लिहिलेले आहे. असे एकून ४३ जिवंत काडतुसे महिलेला सापडली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही सर्व काडतुसे पिंपरी पोलिसांनी जप्त केली आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलायाच्या गुन्हे शाखाने देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळेच पुरावा नष्ट करण्यासाठी हे जिवंत काडतुसे रेल्वे लाईनच्या कडेला टाकली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

खेड पोलिसांना नगर जिल्ह्यात बेदम मारहाण