४३ वर्षाच्या राहुल महाजनचे २५ वर्षाच्या मॉडेलशी तिसरे लग्न

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांचा पुत्र आणि विद्यमान खासदार पुनम महाजन यांचा भाऊ अनेक विवादात अडकलेला राहुल महाजन हा तिसऱ्यादा बोहल्यावर चढला आहे. ४३ वर्षाच्या राहुल महाजनने कझाकिस्तानची २५ वर्षाच्या मॉडेल बरोबर तिसरा विवाह केला आहे. नतालया लिना असे या मॉडेलचे नाव आहे.

मलबार हिल येथील एका मंदिरात मोजक्या २५ जणांच्या उपस्थितीत त्याने विवाह केला आहे. नतालया हिला मी गेल्या दीड वर्षांपासून ओळखतो. या काळात आम्ही दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आलो. ती स्वत:चा व्यवसाय सुरु करु इच्छिते. कौटुंबिक आयुष्य आणि शांत डोके हे महत्वाचे असते. आमच्या वयात फरक असला तरी आम्ही एकमेकांना पुरक आहोत.असे राहुल याने सांगितले.

पायलट असलेल्या श्वेता सिंग हिच्याशी राहुल याचा पहिला विवाह झाला होता. परंतु, त्यांचा विवाह फार काळ टिकला नाही. अमली पदार्थाच्या अतिरिक्त सेवनामुळे तो अनेकदा अडचणीत आला होता.

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर टेलिव्हिजनवरील ‘राहुल दुल्हनियाँ ले जायेंगे’ या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून डिंपी आणि राहुल महाजन यांचा विवाह झाला होता. यामध्ये १६ तरुणींमधून त्याने डिंपी गांगुलीची पत्नी म्हणून निवड केली होती. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकले नव्हते. काही दिवसांपूर्वीच डिंपीने दुबईस्थित उद्योजक रोहित रॉय यांच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर केवळ चार महिन्यांतच राहुलने मारहाण केल्याची तक्रार डिंपीने केली होती. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

बिस बॉसमध्येही राहुल महाजन सहभागी झाला होता. त्यानंतर मुळची कोल्हापूरची असलेली मॉडेल अमृता माने हिच्याशी त्याचे संबंध जुळले होते. ते लवकरच विवाह करणार असल्याचे राहुलने स्वत: सांगितले होते. मात्र, त्यांचा विवाह झाला नव्हत.

उद्धव ठाकरे शिवनेरीवर, मातीचा कलश रामजन्मभूमीला नेणार