होय, होय महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार्‍या भाजप आमदारासह 44 जणांना अटक

जालना : पोलिसनामा ऑनलाईन – जालना जिल्ह्यातील अंबड येथे पहाटे 3.30 वाजता शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणून याठिकाणी तो बसविण्यात आला. यामुळे भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासह 44 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हा पुतळा बसवण्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेण्यात न आल्याने त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे. आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली हा पुतळा बसविण्यात आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य पुतळ्याचा पावित्र्यभंग प्रतिबंध अधिनियम कलम 11, भारतीय दंड विधान 143,149,188, 447 आणि 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर सध्या शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.

जनतेची मागणी –

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार कुचे म्हणाले कि, हा पुतळा बसवण्यासाठी ‘अंबड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाला आहे. त्याचबरोबर जनतेची देखील याठिकाणी पुतळा बसवण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती.

आरोग्यविषयक वृत्त –