Coronavirus Lockdown : ‘कोरोना’च्या रूग्णांची संख्या 4421 वर, 14 एप्रिलनंतर ‘लॉकडाऊन’ वाढवण्याचा मोदी सरकार करतंय विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या प्रकरणांत वाढ होऊन आकडा 4421 वर गेला आहे, तर मृतांची संख्या 117 वर पोहोचली आहे. मंगळवारी नियमित पत्रकार परिषदेत मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत संक्रमणाच्या 354 नवीन घटनांची नोंद झाली आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोमवारीच्या तुलनेत मंगळवारी संसर्गाची संख्या आणि मृतांच्या संख्येत घट झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सोमवारी 24 तासांमध्ये 693 नवीन रुग्ण आढळले असून 30 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन आवश्यक
लॉकडाऊन संसर्गाची गती रोखण्यासाठी प्रभावी असल्याचे सांगत अग्रवाल म्हणाले की, संसर्गाने प्रभावित भागात लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन केल्याने आणि गहन देखरेखीच्या यंत्रणेच्या मदतीने संसर्ग नियंत्रित करण्यास मदत मिळत आहे. ते म्हणाले की, कोरोना संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या आग्रा, नोएडा, पूर्व दिल्ली, भिलवारा आणि मुंबईतील लॉकडाउनच्या उपायाचा परिणाम दिसून येत आहे आणि या भागात परिस्थिती सुधारत आहे.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोपे होतेय काम
अग्रवाल म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुणे, भोपाळ आणि सूरतसह इतर शहरांमध्ये कोरोना नियंत्रण अभियानात नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेवांची प्रभावी मदत मिळत आहे. या मदतीने स्मार्ट सिटीशी जोडलेल्या भागात संक्रमणावर निरीक्षण, रिअल टाइम सिस्टमसह रुग्णवाहिका सेवेचे कामकाज आणि आयटी तंत्रज्ञानावर आधारित माहितीची देवाणघेवाण होण्यास मदत होत आहे. सोबतच, 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर त्याच्या भविष्यातील अटकळणासंदर्भात अग्रवाल म्हणाले की, लॉकडाऊनच्या परिणामाशी संबंधित सर्व बाबींवर सरकार विचार करीत आहे. कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी भविष्यातील रणनीतीसंबंधित निर्णय घेता येईल तेव्हा त्याच वेळी कळविण्यात येईल.

आतापर्यंत 1,07,006 लोकांचा तपास
पत्रकार परिषदेत गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सांगितले की, वैद्यकीय संस्थांना कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजनचा अखंड पुरवठा करावा यासाठी मंत्रालयाने राज्य सरकारांना सूचना दिल्या आहेत. या दरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) वैज्ञानिक रमण आर गंगाखेडकर यांनी सांगितले की, देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत 1,07,006 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये गेल्या 24 तासांत घेण्यात आलेल्या 11795 चाचण्यांचा समावेश आहे. कोविड -19 ची तपासणीसाठी 136 सरकारी व 59 खासगी प्रयोगशाळांमधील चाचणीची सुविधा देशात कार्यरत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

You might also like