कोविडच्या आव्हानात्मक परिस्थितीतही तांदूळ निर्यातीतुन 44 हजार 894 कोटीचे परकीय चलन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील, आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रवासातील आणखी एक मोठा टप्पा पार करत, वर्ष २०२०-२१च्या पहिल्या ९ महिन्यात भारताने तांदूळ निर्यातीत उल्लेखनीय वाढ नोंदविली आहे. देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस पडल्यामुळे तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यंदाच्या चांगल्या पावसामुळे बासमती तसेच इतर प्रकारच्या तांदळाचे निर्यात मोठ्या प्रमाणात झाल्याने देशाला ४४ हजार ८९४ कोटीचे परकीय चलन मिळाले आहे. देशातील बिगर बासमती तांदळाला परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत निर्यातीत १२२% वाढ झाली आहे.

देशातून नेपाळ, बेनिन, युनायटेड, अरब, सोमालिया, इराण सौदी अरब, इराक, कुवैत, यूएसए, युके आदी देशात बासमती आणि बिगर बासमती तांदुळाची निर्यात झाली आहे.

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या ९ महिन्यात बासमती तांदुळाची ३३ लाख ८० हजार ८५४ मॅट्रिक टन निर्यात झाली असून २२ हजार ३८ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे तर बिगर बासमती तांदुळाची ८२ लाख १७ हजार २५५ मॅट्रिक टन निर्यात झाली असून २२ हजार ८५६ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.

मागील वर्षी याच काळात बासमती तांदुळाची २८ लाख ४२ हजार मॅट्रिक टनाची निर्यात झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत बासमती तांदळाची ५ टक्के ने निर्यात वाढ झाल्याचे दिसत आहे तर बिगर बासमती तांदुळाची ३५ लाख ८७ हजार मॅट्रिक टनाची निर्यात झाली होती.मागील वर्षीच्या तुलनेत बिगर बासमती तांदळाची निर्यात १२२ टक्केने वाढली आहे. यंदाच्या चांगल्या पावसामुळे बासमती तसेच इतर प्रकारच्या तांदळाचे निर्यात मोठ्या प्रमाणात झाल्याने देशाला ४४ हजार ८९४ कोटीचे परकीय चलन मिळाले आहे

‘बिगर बासमती’ निर्यातीत १२२ टक्के वाढ
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या ९ महिन्यात बिगर बासमती तांदळाची निर्यात १२२ टक्क्यांनी वाढली असून, बिगर बासमती तांदुळ निर्याती मधून २२ हजार ८५६ कोटींचा व्यवसाय झाला आहे.