ट्रेकिंगला गेलेल्या ३५ आयआयटी विद्यार्थ्यांसह ४५ जण बेपत्ता

शिमला : वृत्तसंस्था

हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसानं झोडपून काढले आहे. त्यातच अनेक ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे. विशेष म्हणजे या अतिवृष्टीमुळे ट्रेकिंगला गेलेल्या ३५ आयआयटी विद्यार्थ्यांसह ४५ जण बेपत्ता झाले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने  हाहाकार माजवला आहे. त्यामुळे तिकडचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच जास्त उंचीच्या ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे. बेपत्ता असलेला एक विद्यार्थी अंकित भाटी याच्या वडिलांनी सांगितले की, सर्व जण हम्पता येथे ट्रेकिंगला गेले होते. त्यांना मनालीत परतायचं होते. परंतु त्यांच्याशी संपर्क तुटला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b6d25592-c07e-11e8-9a6b-0373a0203765′]

लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात ८ जणांचा एक ग्रुप ट्रेकिंगसाठी गेले होते. यात ब्रुनेईची एक महिला संजिता तुबा, नेदरलँडचे एबी लिम आणि ६ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. या ग्रुपमधील प्रियंका वोरा, पायल देसाई, दीपिका, दिव्या अग्रवाल, अभिनव चंदेल आणि अशोक बेपत्ता आहेत. हिमाचल प्रदेशमधल्या मुसळधार पावसाचा कहर पाहता कांगडा जिल्ह्यातील व्यास नदीवर असलेल्या पोंग धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊ शकतात. कारण नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. बीबीएमबीच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, व्यास नदीवरील धरणाचे दरवाजे कधीही उघडण्यात येऊ शकतात. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

[amazon_link asins=’9383098767′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c45d6f6c-c07e-11e8-88bf-9730f14b73bc’]

हिमाचल, पंजाब, काश्मिरात मुसळधार पाऊस

हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, पंजाब, उत्तराखंड या राज्यांत पावसाचा कहर सुरू असून, अनेक ठिकाणी दरडीही कोसळत आहेत. उत्तर भारतात या पावसाने ११ बळी घेतले आहेत. हिमाचलच्या अनेक भागात मुसळधार पावसाने नद्यांना आलेल्या पुरात एक इसमाचा आणि एका मुलीचा मृत्यू झाला. कुल्लू जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रवासी बस, ट्रकसह अनेक वाहनेही पुरात वाहून गेली आहेत. अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, तर काही पुरात वाहून गेली आहेत. पावसाचा जोर असतानाच रोहतांग पाससह अनेक भागांत आताच बर्फवृष्टी सुरू झाली आहे. कुल्लू जिल्ह्यात रविवारी डोबी येथे अचानक आलेल्या पुरानंतर हवाई दलाच्या जवानांनी १९ जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. राज्याच्या ८ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कांगडा, चंबा, मंडी जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. रावी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. डोंगरी भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. चंबा जिल्ह्यात २४ तासात १८० मिमी पाऊस झाला. काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून सोमवारी २९ जणांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यात आले आहे.

इंधन दरवाढीची आग आणखी भडकली, अनेक शहरात पेट्रोल नव्वदीपार