पिंपरीत ४५ हजाराचे ब्राऊन शुगर पकडले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी रेल्वे स्थानकाच्या पाठीमागे ब्राऊन शुगर विक्रीसाठी जवळ बालगलेल्या एका महिलेस अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी दुपारी अडीजच्या सुमारास करण्यात आली.

लक्ष्मी उर्फ वैशाली रवी रणदिवे (२०, रा. पिंपरी) या महिलेस अटक केली आहे. तर माया दिलीप रणदिवे ही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ महिला ब्राऊन शुगर घेऊन उभा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8faf30d4-9faa-11e8-8ac0-3f7673295139′]

संशयित महिलेस ताब्यात घेतले. तिच्याकडे झडती घेतली असता तिच्याकडे ४५ हजार रुपयांची ९ ग्रॅम १०० मिलिग्राम ब्राऊन शुगर हिरोइन आढळून आली. त्यानुसार तिच्यावर कारवाई करण्यात आली. तिची सहकारी महिला बेपत्ता असून पोलीस शोध घेत आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये यापूर्वीही ब्राऊन शुगर पकडण्यात आले आहे. विशेषतः पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरातही ब्राऊन शुगर सापडले आहे.

खंडणी विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक स्वाती थोरात यांनी फिर्याद दिली आहे. निरीक्षक थोरात आणि त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी ही कारवाई केली आहे.
[amazon_link asins=’B014CLL3KS,B07437YHXP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1532f07-9faa-11e8-ab12-97358c040cf8′]