इंदापूर तालुक्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 46 नवे पॉझिटिव्ह ! 2 दिवसांमध्ये 8 व्हेंटिलेटर, 18 ऑक्सीजनसह 26 बेडचं सुसज्ज कोविड सेंटर सुरू होणार

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) –   इंदापूर तालुक्यातील सर्वसामाण्य नागरिक व कोरोनाग्रस्त रूग्णांच्या आरोग्याच्या दृृष्टीने अतिशय महत्वाची खबर असुन येत्या दोन दिवसामध्ये इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयातील तीसर्‍या मजल्याववर कोरोना रूग्णांसाठी अत्याधुनिक बेडचे स्वतंत्र हाॅस्पिटल सुरू होणार असुन त्यामध्ये 8 व्हेंटीलेटर सह 18 आॅक्सिजन मशिन व 26 अत्याधुनिक सुसज्ज बेडची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहीती सुत्रांनी दीली आहे.

यामुळे इंदापूर तालुक्यातील कोरोना पिडीतांची चांगली सोय इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयामध्येच होणार असल्याने तालुक्यातील सर्वसामाण्य नागरिकातुन समाधान व्यक्त होत आहे.तर इंदापूर तालुक्यात सर्व सुविधायुक्त कोरोना सेंटर उभारणी करण्याची मागणी आनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व नागरिकांनी केली होती. तर आनेकजण रिपोर्ट आल्यानंतर बाहेर गावी जावुन खासगी दवाखाण्यात उपचार घेत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थीक झळ सोसावी लागत असल्याने आनेक संकटाचा सामना करावा लागत होता.आता त्याची चिंता मिटली असुन येत्या दोन दिवसातच नविन अत्याधुनिक कोविड सेंटर सुरू होत असल्याची माहीती सुत्रांनी दीली आहे.

दिवसभरात 46 कोरोना पाॅझीटीव्ह

इंदापूर उपजिल्हा रूग्णांलया अंतर्गत कोविड केअर सेंटरमध्ये दिनांक 28 आॅगष्ट 2020 रोजी इंदापूर तालुक्यातील एकुण 18 संशयीतांचे तर भिगवण येथील 20 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी पूणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. वरील सर्व तपासणी रिपोर्ट आज सोमवार दिनांक 31 आॅगष्ट 2020 रोजी सकाळी प्राप्त झाले असुन त्यामध्ये इंदापूर उपजिल्हा रूग्णालया अंतर्गत 18 पैकी महादेवनगर-शहा येथील 1 जण कोरोना पाॅझीटीव्ह आला आहे.तर भिगवण येथील 20 पैकी 13 पाॅझीटीव्ह आल्याने एकुण 14 जण पाॅझीटीव्ह संख्या झाली आहे. बारामती येथील खासगी प्रयोग शाळेतील तपासणीत 6 जण पाॅझीटीव्ह आले आहेत.

तर इंदापूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये आज दिवसभरात रॅपिड आंटिजन टेस्ट अंतर्गत एकुण 88 जणांची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी 26 जण कोरोना पाॅझीटीव्ह आले असुन आज दिवसभरात तीन वेगवेगळ्या ठीकाणच्या कोरोना टेस्टमध्ये एकुण 46 जण पाॅझीटीव्ह आले आहेत तर एकुण 107 जण निगेटीव्ह आले असुन बावडा येथील 61 वर्षीय पुरूषाचा आज मृत्यु झाल्याने तालुक्यातील आजपर्यंत एकुण 33 जणांचा मत्यु झाला असल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुहास शेळके यांनी दीली आहे.

बारामती येथील खासगी प्रयोग शाळेतील तपासणी रिपोर्ट आला असुन त्यामध्ये निमगाव केतकी येथील 65 वर्षीय जेष्ठ नागरिक, 24 वर्षीय युवती व नि.के.राऊत मळा येथील 27 वर्षीय युवक, पळसदेव येथील 38 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरूष व बोरी येथील 50 वर्षीय महीलेचा समावेश आहे.तर पूणे येथील प्रयोग शाळेती प्रलंबीत 38 जणांचे रिपोर्ट आले असुन त्यापैकी 14 पाझीटीव्ह आहेत त्यामध्ये गावांचा उल्लेख नाही.तर

इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटर अंतर्गत फास्ट रॅपिड आटिंजन टेस्ट अंतर्गत इंदापूर तालुक्यातील एकुण 88 जणांची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी 26 पाॅझीटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये तरंगवाडी येथील 34 वर्षीय पुरूष, काटी येथील 45 वर्षीय पुरूष, वैराग, ता.बार्शी येथील 29 वर्षीय पुरूष,बावडा येथील 61 वर्षीय पुरूष, भरणेवाडी येथील 50 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय पूरूष ,40 वर्षीय महिला, 19 वर्षीय युवती, 60 वर्षीय महिला, तर वरकुटे येथील 35 वर्षीय पुरूष, रेडणी येथील 17 वर्षीय मुलगी, 36 वर्षीय महिला, इंदापूर येथील 40 वर्षीय पुरूष, व्याहळी येथील 25 वर्षीय युवती, डाळज नं.1 येथील 48 वर्षीय पुरूष, डाळज नं 2 येथील 40 वर्षीय महीला, पळसदेव येथील 65 वर्षीय जेष्ठ महीला, 36 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय युवक, निमगाव येथील 23 वर्षीय युवती, घोरपडवाडी येथील 26 वर्षीय युवक, 20 वर्षीय युवक, शेळगाव येथील 37 वर्षीय पुरूष,साबळे वस्ती येथील 27 वर्षीय युवक, सणसर येथील 62 वर्षीय महिला, वनगळी येथील 31 वर्षीय पुरूषाचा समावेश असुन कोरोना बाधीतांना पुढील उपचारार्थ इंदापूर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.