धक्‍कादायक ! मुंबईतील 46 % युवक ‘पॉर्न’ आणि ‘बलात्कारी’ सीन पाहण्याच्या ‘आहरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका प्रायवेट सर्वेमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतील १६ – २२ वर्षांच्या मुलांकडून पोर्नोग्राफीचा खूप वापर केला जात आहे. हे सर्वेक्षण रेस्क्यू रिसर्च एंड ट्रेनिंग चैरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत करण्यात आले. याचा मूळ उद्देश हा होता की, कॉलेजमधील तरुणांना पोर्नोओग्राफी कशा पद्धतीने ऍट्रॅक्ट करते हे तपासणे.

एक वर्षभर हा सर्वे करण्यात आला या अंतर्गत मुंबईतील ३० इंग्रजी डिग्री कॉलेज मधील ५०० विद्यार्थ्यांना पोर्नोग्राफी संधर्भात प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांमधून काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या त्या पुढीलप्रमाणे.

१. ३३ % मुलं आणि २४ % मुली या बोलताना अश्लील भाषेचा वापर करतात.

२. कॉलेजची मुले लाखोंच्या संख्येने मोबाईलवर आणि कंप्युटर वर बलात्काराचे व्हिडीओ पाहतात.

३. ६० % मुलांनी हे सांगितले की, पॉर्न व्हिडीओ पाहून ते एस्कॉट सेवा सुद्धा घेतात. यासाठी त्यांना पॉर्न वेब साईटवरूनच कॉनटॅक्ट नंबर मिळतात.

४. ४६ % युवा पुरुष चाईल्ड पॉर्न ऍडिक्ट आहेत. जे की तरुण मुलींच्या वाढत्या तस्करीला प्रोत्साहन देत आहेत.

५. तसेच या सर्वेतून सगळ्यात मोठी धक्कदायक माहिती ही समोर आली आहे की, पोर्नोग्राफीमुळे १० % कॉलेज तरुणी गर्भपात करतात.

याच्यावर उपाय काय ?
कॉलेज पाठयक्रमात सायबर इथिक्सची आवश्यकता आहे.
पॉर्न ब्लॉकिंग सिस्टीमध्ये सुरक्षा वाढवावी कारण बरीच मुले फायरवॉल सेक्युरिटी तडून टाकतात.
कडक कायद्यांची गरज.

मनोवैद्यानिकांच्या मते पोर्नोग्राफीमुळे व्यक्ती हिंसा करण्यासाठी उत्तेजित होतो आणि त्यातूनच बलात्कार छेडछाड अशा घटना घडतात हा एक प्रकारचा कॅन्सर आहे. यापासून मुलांना वाचवण्यासाठी घरातील पालकांनी याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like